२४ ऑक्टोबर १९९५ माझ्या अकराव्या वाढदिवसाच्या आदला दिवस. या दिवशी मी आयुष्यातील पहिले सूर्यग्रहण अनुभवले. विशेष म्हणजे ते भारतातून दिसले होते आणि खग्रास सूर्यग्रहण होते! ग्रहणाविषयी असणाऱ्या अंधश्रद्धा देखील याचवेळी पहिल्यांदा पाहायला मिळाल्या. कालांतराने अनेकदा खग्रास आणि खंडग्रास सूर्यग्रहणे व चंद्रग्रहणे नियमितपणे पाहिली.
यंदाच्या वाढदिवशी कित्येक वर्षांनी पहिल्यांदाच खंडग्रास सूर्यग्रहण अनुभवायला मिळाले. विशेष म्हणजे आजवर पाहिलेल्या सर्व सूर्यग्रहणांपैकी ते एकमेव ग्रस्तास्त खंडग्रास सूर्यग्रहण होते.
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com