मागच्या आठवड्यामध्ये मला एक ओळखीचा फोन आला.
"अरे, आम्हाला फोर्टला जायचय. कसं जायचं सांग ना!"
हे
ऐकून मी काहीसा गोंधळून गेलो. फोर्ट हे तर मुंबईमध्ये आहे. मग तिथे कसं
जायचं, हे मी कसा सांगू शकेल? हा प्रश्न मला पडला. मी म्हणालो,
"ते तर मुंबईमध्ये आहे ना! गुगल मॅपला सर्च कर. भेटून जाईल. मला मुंबई मधलं फारसं माहिती नाही."
यावर तो बोलला,
"अरे फोर्ट...फोर्ट... तू नाही का मागच्या आठवड्यामध्ये लोहगड फोर्टला गेला होता. तसा फोर्ट!"
मग
मला पण फोर्टचा अर्थ उमगला आणि मनातल्या मनात खूप हसू आले. पुण्याच्या
आजूबाजूचे सर्वच 'फोर्ट' अतिशय उंच असल्याने सदर व्यक्ती त्या 'फोर्ट'च्या
'पीक'वर जाऊ शकतील की नाही? याची मला शंका आली आणि शेवटी मी त्यांना चाकण
फोर्टचे नाव सुचवले! 😂
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com