पुढे लिहिण्यापूर्वी खरं सांगायचं तर नामधारी म्हणजे नाममात्र नाही तर
'नवीन नाव धारण करणारे' आहेत. मराठी भाषेमध्ये अनेक लेखक वेगवेगळ्या
नावांनी ओळखले जातात अर्थात प्रत्येकाला स्वतःचे मूळ नाव लावायची हौस असतेच
असं नाही. मराठी कवींमध्ये मात्र ही प्रथा खूप जोरात दिसते. मीही जेव्हा
लिहायला सुरुवात केली होती, त्यावेळेस माझं पूर्ण नाव सर्वप्रथम वापरलं
होतं. तुषार भगवान कुटे अशा पूर्ण नावाने माझा पहिला लेख प्रसिद्ध झाला
होता. काही वृत्तपत्र वाले माझं मधलं नाव काढून टाकायचे. त्यामुळे मी तुषार
भ. कुटे या नावाने लेख लिहायला सुरुवात केली. मराठीमध्ये अशा नावाने लेख
लिहिण्याची परंपरा फारच क्वचित दिसते. त्यामुळे पु. ल. देशपांडे, ग. दि.
माडगूळकर, ह. अ. भावे सारख्या नामवंत लेखक लेखकांकडून प्रेरणा घेऊन काही
लेख मी तु. भ. कुटे या नावाने ही लिहिलेले आहेत. परंतु तरीही तुषार भ. कुटे
या नावाचा मी सगळ्यात जास्त वापर केला. इंग्रजीमध्ये ही प्रसिद्ध झालेले
माझे पहिले पुस्तक "कोअर जावा प्रोग्रामिंग : ए प्रॅक्टिकल अप्रोच" हे मी
तुषार बी. कुटे याच नावाने लिहिलेले आहे. 'महाराष्ट्र हेराल्ड' या
एकेकाळच्या इंग्रजी वृत्तपत्रासाठी मी नाव वापरलं होतं ... K Tushar
Bhagwan! काहीतरी वेगळं करायचं म्हणून तुषार पिंपरीपेंढारकर या नावाने
सुद्धा मी लेख लिहिलेले आहेत. शिवाय एकदा सकाळ मध्ये कविता लिहिली होती ती
'के. तुषार' या नावाने प्रसिद्ध झाली आहे. माझा आवडता खेळाडू सौरभ गांगुली
होता. त्याचंही नाव मी एकदा धारण करून तुषार गांगुली या नावाने लेख लिहिला
होता!!! आपलं नाव सतत पेपर मध्ये प्रसिद्ध होत असल्यास त्याचे विशेष काही
वाटत नाही. त्यामुळे कोणत्याही नावाने लेख लिहिला तरी तो प्रसिद्ध झाला, हे
जास्त महत्त्वाचे होते. साधारणत: पंधरा वर्षांपूर्वी मी पुण्याच्या दैनिक
प्रभात मध्ये 'बाबुराव रामजी' या नावाने ही लेख लिहिलेले आहेत! हे माझ्या
आजोबांचं नाव! आजही या नावाने मी लेख लिहित असतो.
शेक्सपिअरने म्हटलं आहे, नावात काय आहे? हे मराठीतले लेखक पुरेपूर जाणून आहेत. मीही त्यातलाच एक! कदाचित भविष्यात मी आणखी वेगळ्या नावांनी लिहित जाईन. शेवटी काय, लेखकाला आपले विचार पोहोचणे गरजेचे असते बाकी नाव कोणाचेही असो!
शेक्सपिअरने म्हटलं आहे, नावात काय आहे? हे मराठीतले लेखक पुरेपूर जाणून आहेत. मीही त्यातलाच एक! कदाचित भविष्यात मी आणखी वेगळ्या नावांनी लिहित जाईन. शेवटी काय, लेखकाला आपले विचार पोहोचणे गरजेचे असते बाकी नाव कोणाचेही असो!
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com