Showing posts with label Social Networking. Show all posts
Showing posts with label Social Networking. Show all posts

Friday, May 2, 2025

फेसबुक

गोष्ट आहे 2004 सालची. अमेरिकेमध्ये हार्वर्ड नावाचं एक मोठं कॉलेज होतं. याच कॉलेजच्या एका विद्यार्थ्याच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आली. त्याचं नाव होतं मार्क झुकरबर्ग. मार्कला वाटलं, कॉलेजमधील सगळ्या मुला-मुलींना एकमेकांशी जोडता आलं तर किती छान होईल!

त्यावेळी इंटरनेट नवीन-नवीन होतं आणि लोकांचे ऑनलाइन मित्र वगैरे फार नव्हते. मार्कने रात्री-रात्री कोडिंग करायला सुरुवात केली. त्याला मदत केली त्याचे मित्र एडुआर्डो सॅव्हरिन, डस्टिन मॉस्कोविट्झ, अँड्र्यू मॅककॉलम आणि ख्रिस ह्यूजेस यांनी.

आणि मग आली ती तारीख - 4 फेब्रुवारी 2004. याच दिवशी जन्माला आलं 'द फेसबुक' (Thefacebook)! सुरुवातीला हे फक्त हार्वर्डच्या विद्यार्थ्यांसाठीच होतं. लोकांना आपापली माहिती, फोटो टाकायला आणि मित्रांना शोधायला हे खूप आवडलं. बघता बघता, अख्ख्या कॉलेजमध्ये 'द फेसबुक'ची हवा झाली!

हार्वर्डनंतर, मार्क आणि त्याच्या टीमने 'द फेसबुक'ला इतर मोठ्या कॉलेजमध्येही पोहोचवलं. स्टॅनफर्ड, कोलंबिया, येल... जिथे पाहावं तिथे 'द फेसबुक'चे चाहते वाढत होते.

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये, शॉन पार्कर नावाचा एक हुशार माणूस त्यांच्या टीममध्ये सामील झाला. त्याने फेसबुकला कॅलिफोर्नियामध्ये आणलं आणि खरं तर, याच वेळेपासून फेसबुकची खरी वाढ सुरू झाली. पीटर थियल नावाच्या एका मोठ्या माणसाने फेसबुकमध्ये पैसे गुंतवले आणि मग तर विचारूच नका!

2005 मध्ये, 'द' हे नाव काढून टाकण्यात आलं आणि नुसतं राहिलं फेसबुक (Facebook). याच वर्षी, हायस्कूलमधील मुलं-मुली सुद्धा फेसबुक वापरू शकले आणि लोकांना त्यांचे फोटो अपलोड करण्याची सोय मिळाली. आता फेसबुक फक्त कॉलेजच्या मुलांपुरता मर्यादित नव्हतं!

आणि मग आला 2006 चा सप्टेंबर महिना. हा फेसबुकच्या इतिहासातील एक महत्त्वाचा क्षण होता. कारण याच महिन्यात फेसबुक सगळ्यांसाठी खुलं झालं! म्हणजे, ज्याचं वय 13 वर्षांपेक्षा जास्त आहे आणि ज्याच्याकडे ईमेल आयडी आहे, तो फेसबुक वापरू शकत होता. याच वर्षी न्यूज फीड (News Feed) नावाचं एक नवीन फीचर आलं आणि लोकांनी फेसबुक वापरण्याची पद्धतच बदलून गेली. आता तुम्हाला तुमच्या मित्रांनी काय नवीन पोस्ट केलं आहे, हे एकाच ठिकाणी लगेच कळायचं!

2007 मध्ये, फेसबुकने पेजेस (Pages) सुरू केले. यामुळे कंपन्या आणि प्रसिद्ध लोकांना लोकांशी जोडणं सोपं झालं. याच वर्षी फेसबुकने मायस्पेस (MySpace) नावाच्या एका लोकप्रिय सोशल मीडिया साईटला मागे टाकलं आणि ते नंबर वन बनलं! फेसबुकने फेसबुक प्लॅटफॉर्म (Facebook Platform) सुद्धा सुरू केलं, ज्यामुळे इतर कंपन्यांना फेसबुकसाठी ॲप्स बनवता आले.

2009 मध्ये आलं ते जादूचं बटण - लाईक (Like)! आता तुम्हाला काही आवडलं तर फक्त एका क्लिकवर तुम्ही ते सांगू शकत होता. हे लाईक बटन फेसबुकचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य बनलं.

आणि मग आला 2012 चा तो मोठा दिवस, जेव्हा फेसबुक शेअर बाजारात उतरलं! हा एक खूप मोठा इव्हेंट होता आणि फेसबुकची किंमत खूप वाढली. याच वर्षी फेसबुकने इंस्टाग्राम (Instagram) नावाचं एक फोटो शेअरिंग ॲप विकत घेतलं.

पुढे, 2014 मध्ये फेसबुकने व्हॉट्सॲप (WhatsApp) आणि ओक्युलस व्हीआर (Oculus VR) सारख्या मोठ्या कंपन्यांना आपल्यात सामील करून घेतलं. व्हॉट्सॲपमुळे लोकांचं बोलणं आणखी सोपं झालं, तर ओक्युलसमुळे आभासी जगात फिरण्याचा अनुभव मिळाला.

आणि आता, 2021 मध्ये, फेसबुकने आपलं नाव बदलून मेटा (Meta) ठेवलं आहे. आता फेसबुकचा उद्देश फक्त सोशल मीडिया नाही, तर एक मेटाव्हर्स (Metaverse) नावाचं आभासी जग तयार करणं आहे, जिथे लोक आणखी वेगळ्या प्रकारे एकमेकांशी जोडले जातील आणि नवनवीन अनुभव घेतील.

तर ही होती फेसबुकच्या एका कॉलेजच्या रूममधून एका मोठ्या जागतिक कंपनी बनण्यापर्यंतची मजेदार गोष्ट! फेसबुकने खरंच जगाला एकत्र आणण्यात खूप मोठी भूमिका बजावली आहे, नाही का?

--- तुषार भ. कुटे.


 

Monday, June 3, 2019

सोशल मीडिया आणि आपण

दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, सोशल मीडिया नुकतंच पसरू लागलं होतं. त्यावेळेस इंटरनेटच्या वेगळ्या वेबसाईट वर आपलं अकाऊंट असतं, ही गोष्टच खूप मन हर्ष करणारी होती. आज जवळपास प्रत्येकाकडे मोबाईल आहे आणि प्रत्येक जण सोशल मीडियातल्या विविध वेबसाईट वर ॲक्टिव दिसतो. परंतु गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडिया हे व्यसन बनलेले दिसते. प्रत्येकालाच आपले अस्तित्व दाखवायचेय व त्यासाठी सोशल मीडिया सारखं स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारे माध्यम नाही! अनेक जण तर आजकाल सतत ऑनलाईन असणाऱ्या जिवंत असं मानतात. अगदी रात्री दोन वाजता मेसेज केला तरी तो डिलिव्हर झाल्याचा दिसतो! व्हाट्सअप ,फेसबुकचं स्टेटस, इंस्टाग्राम च्या पोस्ट, ट्विटरचे ट्विट्स यातून आम्ही ऑनलाईन जिवंत आहोत. हे दाखवण्याची धडपड प्रत्येकजण करताना दिसतो. परंतु, प्रत्येक व्यसनाचा अंतर हा वाईटच असतो हे सर्वांना ठाऊक आहे. सोशल मीडियासंबंधी रोज एक तरी बातमी पेपरमध्ये वाचायला मिळते. अगदी कालच एक बातमी वाचली. 'जगावे की मरावे?' असा प्रश्न एका मुलीने इंस्टाग्रामच्या पोलमधून विचारला होता. त्याला 70 टक्के लोकांनी नकारात्मक मत दिले. मग या मुलीने आत्महत्या केली! अशा अनेक नकारात्मक बातम्या वाचायला मिळतात. व्हाट्सअप स्टेटस वरून मारामारी, फेसबुक वरच्या कमेंट वरून धमकावणे, गुन्हा दाखल करणे, अगदी खूनही करणे. अशा अनेक बातम्या रोज वाचनात येत असतात. यावरूनच या सोशल मीडियाचा आपल्या जीवनावर किती अवास्तव परिणाम होत चाललाय, हे ध्यानात येते. संवाद माध्यमे वेगवान आणि प्रभावी होत चालली आहेत. परंतु त्यामुळेच नकारात्मकता फावत चालल्याचे आढळते. खरंतर मानवी स्वभावच असा आहे की, कोणत्याही गोष्टीचं आपण नकारात्मक गोष्टी सर्वात आधी शिकतो. अर्थात सोशल मीडियाही याला अपवाद नाहीच. 



मी अनेक जण सोशल मीडियाच्या आहारी गेलेली पाहिली आहेत. त्यांनी माझं स्टेटस का नाही बघितलं? आणि माझी पोस्ट का नाही लाईक केली? असल्या फालतू गोष्टींवर दिवस दिवस विचार करत बसतात. त्यामुळे वेळ तर वाया जातोच आणि मानसिक ताणाने क्रयशक्तीही कमी होत असते. शेवटी या सर्व गोष्टी आपल्याच नियंत्रणात आहेत. आपण आपल्या सोशल मीडियाच्या वापरावर आणि मुख्यत्वे मन:शक्तीवर ताबा मिळवू शकलो तर सोशल मीडियाला केवळ मनोरंजनाचे स्थान आहे, हे पटवून घेऊ शकतो.

Friday, June 22, 2012

शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर


विज्ञानाच्या कक्षा अधिकाधिक रुंदावत असताना संगणक क्षेत्रातील प्रगतीचा वेग मात्र अफ़ाट असल्याचा दिसून येते. माहिती तंत्रज्ञान व दूरसंचार तंत्रज्ञान या दोहोंच्याही प्रगतीच्या वेगाला सीमाच नाही. रोज नवनव्या संकल्पना संगणक विश्वात येऊ घालत आहेत. तंत्रज्ञानातील अशा विविध संपल्पनांचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात आता अपरिहार्य होऊ पाहत आहे. शिक्षण क्षेत्र हे तंत्रज्ञानाच्या वापरापासून आता दूर राहू शकलेले नाही. एका अर्थाने तंत्रज्ञानातून साध्य वेगाची भुरळ ही प्रत्येक क्षेत्रात दिसून येत आहे.
तंत्रज्ञानाच्या प्रभावामुळे शिक्षणपद्धतीत बदल हा निश्चितच घडत आहे व तो स्वागतार्ह मानला पाहीजे. पाश्चिमात्य देशांमध्ये शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाने मोठी प्रगती घडवून आणली. याच कारणामुळे तेथील शिक्षणाच्या दर्जात व वेगातही वाढ झालेली आहे. या गोष्टी भारतीय शिक्षणक्षेत्रातही रुजणे अत्यंत आवश्यक आहे. अशा प्रकारच्या आधुनिकीकरणाने आपण भारतीय शिक्षणपद्धतीचा दर्जा निश्चित सुधारु शकु. माहिती तंत्रज्ञानाचा वापर एक शिक्षक म्हणून रोजच्या शिक्षणात कसा करता येऊ शकेल, याचाच आढावा घेत असलेला हा लेख.
शहरात संगणक वापरकर्त्यांची संख्या जशी वाढत आहे तशी ती ग्रामीण भागातही वाढत आहे. आज संगणकाच्या किमती बऱ्याच अंशी कमी झाल्याने शहरी व ग्रामीण भागातील मध्यमवर्गीय जनांना आता संगणक विकत घेणे हे परवडण्यासारखे आहे. इंटरनेटच्या वापराविषयी आजची युवा पिढी अतिशय जागरूक झाली आहे. अगदी १२-१३ वर्षाचा मुलगाही इंटरनेट सहजपणे वापरु लागतो. शिवाय बीएसएनएल सारख्या सरकारी कंपन्यांनी अतिशय कमी दरात इंटरनेट सुविधा सर्वसामान्यांच्या घरात पोहचवली आहे. इंटरनेटविषयी कुतूहल असणारी मुले बहुतांश वेळा संगणकीय खेळ खेळण्यासाठी किंवा चित्रपट पाहण्यासाठी व गाणी ऐकण्यासाठी संगणक व इंटरनेटचा वापर करतात. अर्थातच, हा संगणक व इंटरनेटचा योग्यउपयोग निश्चित नाही. परंतु संगणकाचा वापर एखाच्या शिक्षकाने ठरविले तर खुपच उत्तम प्रकारे विद्यार्थांच्या दैनंदिन जीवनात शिक्षणासाठी करवून घेता येऊ शकतो. त्याचे काही उदाहरणे पहा.
           १) पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन अर्थात PPT
संगणकाद्वारे सादरीकरण करण्यासाठी वापरण्यात येणारे सर्वोत्तम सॉफ़्टवेअर म्हणजे मायक्रोसॉफ्टचे पॉवरपॉइंटहोय. विविध तंत्रज्ञान संस्थांमध्ये PPT चा वापर आपल्या विषयाचे सादरीकरण करण्यासाठी केला जातो. खडू व फळा या पारंपारीक पद्धतीला पर्याय म्हणून या संगणकीय पद्धतीचा वापर होतो. त्याचा वापर तंत्रज्ञान क्षेत्रातील विद्यार्थांना अपरिहार्य आहे. परंतू केवळ तंत्रज्ञानाशीच याचा संबंध न राहता संपूर्ण शिक्षण क्षेत्रातील विविध विषयांसाठी PPT चा वापर करता येऊ शकतो. अनेक पाश्चिमात्य संस्थांनी विविध ज्ञानशाखांकरिता PPT ह्या इंटरनेटवर उपलब्ध करुन दिल्या आहेत. शिवाय त्या इंटरनेटवरून डाऊनलोडही करता येतात. अशा प्रकारचा एक प्रकल्प अमेरिकेतील एमआयटीसंस्थ्येने 'Open Course Ware' या नावाखाली इंटरनेटद्वारे उपलब्ध करुन दिला आहे. ह्यातील विविध विषयांवरील PPT मुलांना अभ्यास म्हणून उपलब्ध करुन दिल्यास, ते निश्चितच संगणकाद्वारे अभ्यास करु शकतील.
) गुगल न्युजग्रुप:-
News Group ही संकल्पना पाश्चिमात्य देशांत जवळपास तीस पेक्षा अधिक वर्षांपासून राबवली जात आहे. संगणक क्षेत्रातील अनेक शोध हे न्युजग्रुप मुळेच प्रकाशझोतात आले. असे असले तरी भारतात ही संकल्पना फ़ारशी रुजलेली नाही. न्युजग्रुप मध्ये इंटरनेटद्वारे विविध चर्चा सत्रे व बातमी विवरण सत्रे आयोजित केली जातात. त्याचा वापर माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी होतो. एका विशिष्ट विषयाला वाहिलेले लाखो न्युजग्रूप्स हे गूगलवर उपलब्ध आहेत. अशा ग्रूप्सचे ईमेलद्वारे सभासद होऊन एखाद्या विशिष्ट विषयावरची नवनवी माहिती मिळवता येऊ शकते. शिवाय शिक्षकही असे न्युजग्रूप्स तयार करुन विद्यार्थ्यांशी माहितीची देवाणघेवाण करू शकतात. याची माहिती groups.google.com वर उपलब्ध आहे.
) गूगल साईट्स:-
स्वत:ची मोफत साईट तयार करण्याची संकल्पना गूगलने यशस्वीपणे राबवली आहे. ’याहूने तयार केलेली geocities ही मोफत साईट्सची सुविधा बंद झाल्याने गूगल साईट्सने मोठी झेप घेतली. गूगलच्या या सुविधेद्वारे आपल्याला स्वत:ची मोफत साईट तयार बनविता येते. त्यासाठी वेबसाईट बनविता येणारे सॉफ्टवेअर वा संगणक भाषा वापरण्याची आवश्यकता नसते. ह्या वेबसाईटचा पत्ता sites.google.com/sites ने सुरू होतो. १०० मेगाबाईट्स पर्यंत माहिती आपण एका वेबसाईटवर साठवू शकतो. एखाद्या विषयावरची इत्यंभूत माहिती देण्याकरिता अशा प्रकारच्या साईट्सचा वापर करता येतो. विषयाची ई-बुक प्रश्नसंच, बोर्डाच्या / विद्यापीठाच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिका यासारखे soft copy साहित्य आपल्या साईट्सला जोडता येतात व जगातून ती साईट कुठुनही उघडल्यास डाऊनलोडही करता येतात. -मेल न वापरता विविध विषयांवरील माहितीची देवाणघेवाण करण्याकरिता हे उत्तम साधन आहे. स्वत:ची वेबसाईट तयार करण्यासाठी sites.google.com ला भेट द्यावी लागेल.
) युट्युब (व्हीडिओ साईट):-
विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी वापरण्यात येणारी जगातील सर्वात मोठी वेबसाईट म्हणजे youtube.com होय. गेल्या तीन वर्षांपासून या वेबसाईटची लोकप्रियता कैकपटीने वाढली आहे. ती इतकी आहे की, आज इंटरनेटवरील कोणताही व्हिडिओ प्रथम युट्युबवर शोधला जातो. याच कारणास्तव जगातील अनेक नामांकित संस्थांनी त्यांचे व्हिडिओ लेक्चर्स या वेबसाईटवर अपलोड केले आहेत, जे जगात कुठेही पाहता येतात. शिवाय आयआयटी व आयआयएम सारख्या भारतीय संस्थाही याच वेबसाईटवर आपले व्हिडिओ अपलोड करत असतात. अशा प्रकारे युट्युबने ज्ञानाचे विपुल भांडार उपलब्ध करून दिले आहे. त्यातील आपल्याला हवे असलेले उपयुक्त व्हिडिओ डाऊनलोड करून किंवा थेट ऑनलाईन विद्यार्थ्यांसोबत प्रदर्शित करता येऊ शकतात. वर्गात मिळाणाऱ्या ज्ञानाबरोबरच इतर ज्ञानाचाही स्त्रोत म्हणुन युट्युबचा वापर करता येवू शकेल.
) ब्लॉग:-
इंटरनेटद्वारे आपले विचार आपल्या भाषेत खुलेपणाने मांडण्याकरिता गेल्या काही वर्षांपासून ब्लॉग या संकल्पनेची लोकप्रियता वाढत आहे. केवळ अभ्यासक्रमातीलच नव्हे तर दिशादर्शक विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी ब्लॉगचा वापर शिक्षकांद्वारे करता येऊ शकतो. ब्लॉगचे विश्व इंटरनेटद्वारे झपाट्याने विस्तारले आहे. लहान मुलांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत अनेक जण ब्लॉगच्या माध्यमातून विचारमंथन करत असतात. मार्गदर्शक ब्लॉग लिहुन शिक्षक नक्कीच विद्यार्थ्यांच्या करियरला नवी दिशा देऊ शकतात. ज्या गोष्टी सांगण्यासाठी शिक्षकांना वर्गात वेळ मिळत नाही, अशा अनेक मार्गदर्शक गोष्टी ब्लॉगमधुन मांडता येतील. शिवाय आज संगणकात युनिकोडउपलब्ध झाल्याने सर्वच भारतीय भाषांत ब्लॉग लिहिता येतात. या युनिकोडचा वापर केवळ ब्लॉगपुरताच मर्यादित नसुन इंटरनेटवर प्रत्येक ठिकाणी त्याचा वापर करता येतो. त्याची अधिक माहिती www.baraha.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे. शिवाय ब्लॉग तयार करण्यासाठी सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या वेबसाईटस आहेत:- blogger.com wordpress.com.
) SMS चॅनेल:-
एकाच वेळी अनेक जणांना माहितीवजा SMS पाठविण्यासाठी गूगलने तयार केलेली सेवा म्हणजे SMS channel होय. याद्वारे आपल्याला स्वत:चे SMS channel तयार करता येते व एकाच वेळी अनेकांना SMS पाठविता येतात. गूगलच्या विश्वात अनेक माहितीपूर्ण SMS channel उपलब्ध आहेत. ज्याद्वारे विविध विषयांवरील नवी व जुनी माहिती SMS द्वारे मिळवता येते. विद्यार्थ्यांना अशी उपयुक्त माहिती देण्याकरिता शिक्षक असे SMS channel तयार करू शकतात. मोबाईलचा विधायक वापर करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. त्याची माहिती labs.google.co.in वर उपलब्ध आहे.
) सोशल नेटवर्किंग:-
आजची युवा पिढी फेसबुक सारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सला चिकटुन असते. विविध गोष्टी शेयरकरण्यासाठी व नवे मित्र जोडण्याकरिता फेसबुकची मदत होते. याच फेसबुक बरोबरच twitter सारख्या मायक्रोब्लॉगिंग साईटसचाही विद्यार्थ्यांशी इंटरनेटद्वारे संवाद साधण्याकरिता उपयोग करता येऊ शकेल.
वरील सातही संकल्पना मी माझ्या दृष्टीने सादर केल्या आहेत. त्यामुळे शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर केवळ यापुरताच मर्यांदित नाही, तो ज्याच्या-त्याच्या दृष्टीकोनावर अवलंबुन आहे. भविष्यात शिक्षणपद्धतीला गती येण्यासाठी अशा तंत्रांचा वापर वाढत जाणार आहे. त्यामुळे शिक्षकांनी याचा वापर आतापासूनच सुरू केल्यास त्याच्या निश्चितच चांगला फायदा मिळू शकेल.
                                                                  - तुषार भ. कुटे....

Monday, May 3, 2010

Facebook for divorce...!

Recently, I read news in British daily Sunday Mail. British marriage counselors claim that social networking sites like Facebook are contributing to separations and divorces.
According to the Sunday Mail, British divorce firm Divorce-Online said Facebook was cited in one-fifth of the divorce petitions it processed last year. It emerged that a number of bored middle-aged users in their 40s and 50s have had their lives thrown into turmoil as they try to reconnect with childhood sweethearts through the sites. Australian Family Relationships Clearing House manager Elly Robinson said online behavior was causing friction in households.

This is one of the examples showing that technology that affected our day to day life very deeply. We got many of the advantages as well as disadvantages too. Now, the news stated above shows both. The social networking sites on internet are very popular. In India, almost all the internet users know the Orkut. Likewise, Facebook, LinkedIn, Twitter are also popular. This trend of social networking is not much old. Just 6-7 years ago, MySpace has initiated this concept. Now, this is broadened. And almost all the internet users are connected with social networks. We found many of the old friends on these sites. We got the sharing of the information through such sites. Personally, I support the social networking sites. Because, if you use it positively then its very nice concept initiated on the web. But, now the world is going to face new challenge of using these sites. The one is stated above. I read few months back that the terrorists groups were started using the social networking sites to create new identities. This was also one of the disadvantages of these sites.
Many times we got youth are online on the websites chatting with their friends. But the news stated that middle aged users are now searching for their old sweethearts to get connected with them. This has caused many divorces in world and especially in USA and UK. Now, it is up to us how we use the modes of the technologies. This trend is not yet came to India. And hope will not come to our country! We must keep ourselves safe while using the technologies. It must not damage any type of the relationships. We must be aware the proper use of internet and its related resources.