मराठी भाषेतील एक गूढ पुस्तक म्हणजे 'निळावंती' होय. याच नावाचे पुस्तक
निसर्ग लेखक मारुती चित्तमपल्ली यांनी लिहिले आहे. त्याच्या जुन्या
पुस्तकाशी तसा काही संबंध नाही. हे पुस्तक म्हणजे त्यांच्या विविध
नियतकालिकात प्रकाशित झालेल्या कथांचा व लेखांचा संग्रह होय. आपल्या
सहजसुंदर भाषेत त्यांनी निसर्गाला शब्दबद्ध केले आहे. मुंग्या, कोल्हा,
कीटक, रानउंद्रे, तांबट, मोर अशा पक्षी-प्राणी सृष्टीची एक वेगळी ओळख या
पुस्तकातून होते. शेवटचे दोन लेख "पक्ष्यांपासून माणसाला काय शिकता येईल?" व
"जंगल: आपला मित्र" हे प्रत्येकाने वाचावे, असेच आहेत. निसर्ग लेखकाची खरी
दृष्टी या लेखनातून दिसून येते. मानवा इतकंच प्राणी-पक्ष्यांचे व निसर्गाचे
जग अद्भुत आहे, हेच मारुती चितमपल्ली या छोटेखानी पुस्तकातून दर्शवतात. या
पुस्तकाचे एक पान सोबत जोडले आहे ते नक्की वाचा.
Showing posts with label nature. Show all posts
Showing posts with label nature. Show all posts
Friday, March 27, 2020
Monday, March 9, 2020
वृक्षवाढीचा वेग मंदावतोय!
जगप्रसिद्ध
इकॉलॉजी जर्नलने अमेझॉन जंगलातल्या पुनर्वाढीचा वेग अपेक्षेपेक्षा अत्यंत
मोठ्या प्रमाणात मंदावल्याचे निरीक्षण नोंदविल्याचे प्रसिद्ध केले आहे.
मानवाकडून सतत निसर्गाचा व नैसर्गिक संपत्तीचा होणारा अशा प्रकारचा ऱ्हास
सातत्याने समोर येतोय. विविध निसर्गतज्ञ, भूगर्भशास्त्रज्ञ,
वनस्पतिशास्त्रज्ञ तसेच पर्यावरणतज्ञ अनेक वर्षांपासून जी निरीक्षण नोंदवत
आहेत, त्यातून अत्यल्प गोष्टी सकारात्मक आढळून येत आहेत. बहुतांश गोष्टी या
नकारात्मकच असल्याचे दिसते. मागच्या काही दशकांपासून मानव प्राण्याने
प्रगतीच्या नावाखाली चालू केलेला ऱ्हास हा पृथ्वीवरील मानवी जीवनाच्या
ऱ्हासाकडे चालू असल्याचे दिसते. इकॉलॉजीचे अमेझॉनच्या जंगलासंबंधीचे
निरीक्षण हे जगातील इतर जंगलांना ही जवळपास समानच लागू होते. वृक्षाच्छादित
जमिनीचे क्षेत्र मागच्या अनेक दशकांपासून कमी होत चाललंय. प्रगतीच्या
नावाखाली होणारी निसर्गाची अपरिमित हानी निसर्गाचा समतोल ढासळत आहे. याचे
परिणाम निश्चितच येणाऱ्या काही पिढ्यांना भोगावे लागतील. जमिनीचे हरितकरन,
तापमान बदल, हवामान बदल यामुळे मानवी जीवनशैलीही बदलत चालली आहे. अर्थात
परिस्थिती आणखी प्रतिकूलतेने कडे झुकत आहे, हेच या सर्वांमधून प्रतीत होते.
यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरच पावले वेगाने उचलणे गरजेचे आहे. परंतु,
परिस्थिती हाताबाहेर जाण्यापुर्वी हे सर्व उपाय योजले तरच योग्य ठरेल!
Thursday, February 13, 2020
प्लास्टिक पासून मुक्ती
महाराष्ट्रातील समुद्र किनारे प्लास्टिकच्या बारीक कणांमुळे
अधिक प्रदूषित झाल्याचे निरीक्षण पणजी स्थित 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ
ओशनोग्रफी' या संस्थेतर्फे नोंदविण्यात आले आहे. शिवाय नेदर्लंड्सच्या एका
प्रसिद्ध जर्नलमध्ये ही या संदर्भातला लेख प्रसिद्ध झाला आहे. मनुष्यप्राणी
निसर्गामध्ये करत असलेल्या लुडबूडीचा व विशेषतः निसर्गाच्या हानीचा हा एक
मोठा पुरावाच मानावा लागेल. रसायन शास्त्राने मानवाच्या हाती दिलेला एक
घातक पदार्थ म्हणजे प्लास्टिक होय. तसा तो घातक नाहीये, परंतु मानव प्राणी
ज्या प्रमाणे त्याचा वापर करत आहे ते पाहता तो घातकच बनत चाललाय!
कोकणातल्या मुक्त समुद्रकिनाऱ्यांवर गेल्या काही वर्षांपासून पिकनिकच्या
नावाखाली होणारी गर्दी वाढत चालली आहे. त्यामुळे मानवनिर्मित कचऱ्याचीही
वाढ होत आहे. त्यात प्लास्टिक कचरा हाच सर्वात मोठ्या प्रमाणात
समुद्रकिनाऱ्यांवर टाकला जातो. देशाचे 'सुजाण' नागरिक म्हणून निसर्गाची
हानी आपण अशाप्रकारे करतच असतो. त्याची परिणिती किनाऱ्यावरील कचर्यात वाढ
होण्यामध्ये झालीये. राज्यात लागू झालेल्या प्लास्टिकबंदी नंतरही ते
वापरण्यात तीळमात्रही फरक पडलेला नाही. मुख्यतः शासनातही त्यात फारसे
घेणेदेणे उरलेले नाही, असेच दिसते. निदान सर्वांनी या देशाचे 'सजग' नागरिक
म्हणून तरी आपली जबाबदारी ओळखायला हवी व आपल्या सोबत निसर्गाचाही प्लास्टिक
पासून मुक्ती द्यायला हवी.
Friday, November 15, 2019
निसर्ग बदलांकडे...
मागच्या काही वर्षांपासून वातावरणात व हवामानात होत चाललेले बदल आता
प्रकर्षाने लक्षात येऊ लागलेत. यंदाचा ऑक्टोबर महिना पूर्ण पावसाचा गेला.
शिवाय कधी नव्हे ते पूर्ण दिवाळीतही पाऊस पडला! निसर्गाकडून मानवजातीला
देण्यात येणारी ही धोक्याची घंटा समजायला हवी. मानवनिर्मित कारणांमुळे
निसर्गाचा समतोल ढासळत चालला आहे. त्यामुळे सर्वच ऋतूंवर त्याचा प्रतिकूल
परिणाम होतोय. हिवाळ्यात थंडीची तीव्रता वाढत चालली व उन्हाळ्यातही उन्हाची
दाहकता नवे नवे उच्चांक गाठत आहे. नुकतेच क्लायमेट सेंटरने प्रकाशित
केलेल्या अहवालात मुंबईसह अन्य मोठी शहरे येत्या तीस वर्षांत पाण्याखाली
जाण्याची शक्यता वर्तवली आहे. अशा विविध धोक्याच्या घंटांनी आता तरी नागरिक
व सरकारांनी जागे व्हायला हवे. पर्यावरण शिक्षणाला फारसे गांभीर्याने न
घेतल्याने मानव जातीकडून निसर्गाची अतोनात हानी होत आहे. त्यामुळेच
निसर्गाचे पलटवार मनुष्य जातीवर होत आहेत. या सर्व घटनांची कारणमीमांसा
होणे व त्यावर ठोस उपाययोजना करणे गरजेचे वाटते. केवळ मूठभर
पर्यावरणवाद्यांमुळे पर्यावरणात बदल घडेल, अशी अपेक्षा करणे मूर्खपणाचे
ठरेल. निसर्ग संवर्धनासाठी सरकारबरोबरच नागरिकांचाही सकारात्मक व सबळ
पाठिंबा असायला हवा. तरच भविष्यात येऊ घालणाऱ्या नैसर्गिक संकटापासून आपण
आपल्याला व येणाऱ्या पिढीला वाचवू शकू.
Tuesday, August 9, 2011
निसर्ग प्रेरित संगणन
निसर्ग हा मानवजातीचा सर्वात मोठा गुरु मानला जातो. नाना तऱ्हेने निसर्गाने मानवास सतत काही ना काहीतरी शिकवण दिलेली आहे. विज्ञान व निसर्ग यांचे अत्यंत घनिष्ट नाते आहे. तेच नाते आता तंत्रज्ञान व निसर्ग यांच्यातही निर्माण होताना दिसते आहे. संगणक तंत्रज्ञानाने केलेली प्रगती ही गेल्या काही वर्षात सर्गाने प्रेरीत झाल्याचे दिसून येते. अनेक नैसर्गिक रचना ह्या तंत्रज्ञानातील विविध संकल्पनांना जन्म देताना दिसत आहेत. तंत्रज्ञान हे एका अर्थाने निसर्गाचे शिक्षक बनून राहिले आहे. मानवी प्रगतीला पोषक वातावरण तंत्रज्ञान व निसर्ग या द्वयीने तयार केल्याचे दिसून येते. मूलत: संगणक हेच निसर्ग प्रेरीत तंत्रज्ञानाचे सर्वात मोठे यंत्र आहे, असे संगणक इतिहास सांगतो. संगणक ह्या संकल्पनेचा श्रीगणेशा यांत्रिक संगणक अर्थात मेकॅनिकल कॉम्प्युटर ने झाला. चार्लस बाबेजने बनविलेला पहिला संगणक हा यांत्रिक संगणक होता. आजच्या संगणकाप्रमाणे त्याच्यात कोणत्याही प्रकारे इलेक्ट्रॉनिक रचना नव्हती. केवळ यांत्रिक हालचांलींद्वारे हा संगणक कार्य करायचा. अर्थात या पूर्ण यंत्रावर नियंत्रण ठेवणारे कोणतेच स्वयंचलित उपकरण त्याच्यात नव्हते. सन १९५० पर्यंत असणारे सर्वच संगणक या प्रकारात मोडत असत. परंतू, तोवर इलेक्ट्रोमेकॅनिकल संगणकाचे युग अवतरले होते. यांत्रिक हलचालींना विजेचीही सोबत लाभली होती. त्यामुळे संगणकाचा वेग वाढण्यास मदत झाली. विसाव्या शतकाच्या मध्यकाळात जॉन व्हॉन न्यूमन ह्या हंगेरीयन गणिततज्ञाने संगणकाचे रुपच पालटून टाकले. संगणकाच्या सर्व भागात सुसूत्रता आणण्यासाठी एका ’सेंट्रल प्रोसेसर’ची संकल्पना यांनी न्यूमन त्यांच्या संगणकीय रचनेत मांडली. संगणकाच्या आदान (इनपूट) व प्रदान (आऊटपूट) माध्यामांमध्ये एकच सेंट्रल प्रोसेसर बसवून संगणक तयार करण्याची कल्पना न्यूमन यांनी संगणक विश्वासमोर ठेवली. मानवी शरीर ही त्यामागची कल्पना होती. मानवी शरीरातील कोणताही अवयव स्वतंत्रपणे स्वत:च्या सूचनांनूरुप कार्य करत नाही. आपल्या सर्व अवयवांना नियंत्रित करण्याचे काम मानवी मेंदू करत असतो. मेंदूतील सूचनांनूसारच आपले हात, पाय, कान, नाक, डोळे आदि अवयव कार्य करतात. त्यामुळेच मानवी कार्यात सुसूत्रता येते. हीच संकल्पना न्यूमन यांनी संगणकाला लागू केली व त्यातून आधुनिक संगणक रचनेचा जन्म झाला. आजही जगातील सर्व संगणकांत सेंट्रल प्रोसेसर अर्थात मानवी मेंदूप्रमाणे ’मायक्रो प्रोसेसर’ कार्य करत असतो. त्यामुळेच न्युमन यांना अधुनिक संगणकाचे जनक मानले जाते. मुख्यत: संगणक हाच निसर्ग प्रेरीत संकल्पनेतून जन्मल्याने त्याचे नवे तंत्रज्ञान तसेच व्हावे यात आश्चर्य वाटायला नको.
आट्रिफ़िशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता
संगणकाला मानवी कृतिंशी सांगड घालून कार्य करण्यास लावणारी संगणकाची शाखा म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता होय. जॉन मॅकार्थी हे या संकल्पनेचे जनक मानले जातात रोबोट हे कृत्रिम बुद्धिमत्तेचे सर्वोत्तम उदाहरण आहे. यंत्र हे मानवासारखे बनू शकते का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याच्या प्रयत्नांचे फ़लित म्ह्णजे रोबोट होय. पूर्णपणे मानवी कार्य करणारा परिपूर्ण रोबो बनविण्यात शास्त्रज्ञांना १०० ट्क्के यश आले नसले तरी त्यांनी बरीचशी कामे रोबो कडून करवून घेतली आहेत. ता क्षेत्रात अजूनही मोठ्या प्रमाणात संशोधन चालू आहे. संगणक विज्ञानाची सर्वोत्तम ताकद आज रोबोटिक्स मध्ये कार्यरत आहे. तमिळ भाषेत तयार झालेला व रजनीकांत आभिनित ’इंदिरन’ या चित्रपटात अशाच प्रकारच्या रोबोचे कारनामे दाखविण्यात आलेले आहेत. त्यातील अतिशयोक्ती सोडली तर ही संकल्पना संगणक तज्ञांना सर्वाधिक आकर्षित करणारी आहे, हे मात्र खरे!
न्युरल नेटवर्क
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उदरातून जन्म पावलेली ही संज्ञा होय. मानवी मेंदूमध्ये माहिती साठवण्याकरीता मोठे न्यूरॉनचे जाळे पसरलेले असते. हे न्यूरॉन्स म्ह्णजे मेंदूतील अतिशय सूक्ष्म घटक होत. मानवी मेंदूतील या संरचनेचा वापर ’न्यूरल नेट्वर्क’ तयार करण्यासाठी केला गेला आहे. गणिती पद्धतीने त्यातील सुसूत्रता ओळखून त्याचा वापर संगणकात करण्यात येतो. शिवाय मानवी मेंदू माहिती साठवण्यासाठी ज्या संरचनेचा वापर करतो, तिच संगणकातही वापरण्यात आलेली आहे. यापद्धतीत वापरण्यात येणारी अचूकता व सुसूत्रता यामुळे संगणकात माहिती साठवणे सोपे जाते.
नैसर्गिक भाषा प्रक्रिया अथवा नॅचरल लॅंग्वेज प्रोसेसिंगं
मानवी भाषा जसे मराठी, इंग्रजी, फ़्रेंच, तमिळ आदि संगणकास बोलायला लावणे अथवा समजावणे, यास नैसर्गिक भाषा प्रक्रिया म्हटले जाते. प्रामुख्याने मानवी व्यंगावर मात करण्यासाठी किंवा व्यंग असलेल्या व्यक्तिशी संवाद साधन्याकरिता या तंत्रज्ञानाचा वापर होतो. नैसर्गिक भाषा अर्थात मानवी भाषा ह्या संगणकाला समजत नाहीत. संगणकाला समजणारी भाषा व मानवी भाषा यांची सांगड घालणे, हे आव्हान घेऊनच Natural Language Processing चा जन्म झाला. याचा वापर करुन आज संगणक विश्वात बरीच सॉफ़्ट्वेअर कार्यरत झाली आहेत. उद्या केवळ संगणकाच्या आधारे मानवाने आवाज निर्मिती केली तर आश्चर्य वाटायला नको.
स्वॉर्म इंटेलिजन्स अर्थात कीटक बुद्धिमत्ता
अगदी शुद्रातील शुद्र प्राणीसुद्धा मानवजातीला अनेक धडे देऊन जातो. ह्या धड्यांचाच संगणकीय दृष्टिकोनातून अभ्यास करणारी शाखा म्हणजे स्वॉर्म इंटेलिजन्स होय. एखाद्या सिस्टिममध्ये बरीचशी कामे साचेबद्ध पद्धातीने व सुसूत्रतेने कशी करावीत? याचे उत्तर शोधणारी ही शाखा आहे. मधमाश्या व मुंग्या सामूहिकरित्या त्यांची कामे कशी करतात याचा अभ्यास करुन त्याचे कॉम्प्युटर अल्गोरिदम बनवले जातात. संगणकातील अनेक कामे अधिक वेगाने करुन घेण्याकरीता याचा वापर होतो. मुंग्यांच्या कार्यपद्धतीत सामूहिक बुद्धमत्तेचा धागा संगणक विज्ञानाने शोधला आहे. मुंगी जर एकटी असते तर तिच्या कामाला काहीच महत्व नसते. परंतु, सामुहिकरित्या मुंग्या ह्या अतिशय सुसूत्रतेने कार्य साध्य करतात. अन्न शोधण्यासाठी सामुहिकरित्या मुंग्या सर्वोत्तम मार्ग कसा काढतात, याचा अभ्यास करुन सर्वोत्तम संगणकीय अल्गोरिदम विविध ठिकाणी वापरले जातात. अशाच पद्धतीने मधुमाश्या योग्य वेळी निर्णय घेण्याची क्षमताही संगणकात वापरता येऊ शकते, हे कॉर्नेल विद्यापीठाच्या थॉमस सीले यांनी सिद्ध केले आहे.
निसर्ग प्रेरीत संगणन हे केवळ एवढ्याच शाखांमध्ये मर्यादित नसून संगीत, मानवी डीएनए, मानवी दृष्टीची रचना, जीवाणूंचे संवाद अशा विविध क्षेत्रांचा अभ्यासही त्यात आता नव्याने दाखल होत आहे.
दैनिक दिव्य मराठी (नाशिक व औरंगाबाद) मध्ये प्रसिद्ध झालेला लेख:
मूळ लिंक्स:
Friday, June 4, 2010
Magic of Nature

I always think the nature is biggest controller of this world. Whatever the science that existed today, is only because of the nature. We observe the life cycle of the nature. The monsoon rain is one of the parts of it. It has become the part of life cycle of people in south Asia. Every year we eagerly wait for this monsoon.
I have observed several time in last few years that always 1st June has become the day of heavy rain. It was either a monsoon rain or a pre-monsoon rain. For only few circumstances, it did not happen till in my life. This year also it was a heavy rain fall on 1st June in Nashik. We enjoyed all these. I salute to the magic of nature. This time also the monsoon has reached in south Asia on time. It is in Kerala now. In coming two-three days it will be reaching in Maharashtra. Hope this year at least 100 percent monsoon rain fall will be there.
Due to global warming, we are changing the climate of the nature. This will be harmful for the life of human on this planet. So we must take care of such things. These are very small things, but have very large meaning. We must ensure the safety to the future generations of the human being…!
Subscribe to:
Posts (Atom)


