Showing posts with label Marathi Exam. Show all posts
Showing posts with label Marathi Exam. Show all posts

Friday, October 11, 2019

एक्झाम वॉरियर्स - नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेले हे पुस्तक आहे, "एक्झाम वॉरियर्स". अगदी अपघातानेच हे पुस्तक हाती आले. परीक्षेला केंद्रभागी ठेवून लिहिलेले कदाचित हे पहिलेच 'सुटसुटीत' पुस्तक असावे. शालेय जीवनात विद्यार्थी अनेकदा परीक्षांना सामोरे जातात. परीक्षा हेच शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनात भीतीचे सर्वात मोठे कारण असते. हीच भीती उद्भवू नये, म्हणून काय करावे? या प्रश्नाचे उत्तर या पुस्तकातून मिळते. परीक्षा म्हणजे नक्की काय? स्पर्धा, तंत्रज्ञान, विश्रांती, खेळ, झोप, ताणतणाव, आत्मविश्वास, शिस्त, शैली, कॉपी, आत्मचिंतन, प्रवास, तंदुरुस्ती अशा विविध अंगांना लेखकाने खूप उत्तम प्रकारे व सहजपणे हाताळले आहे. 


वरील काही शब्द वाचायला जरी जड वाटत असले तरी त्यांची शालेय विद्यार्थ्यांच्या दृष्टीने मांडणी छानपणे करण्यात आली आहे. हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी एक प्रकारे 'पर्सनल डायरी' सारखे काम करेल असेच आहे. जवळपास प्रत्येक धडा 'क्यूआर कोड'ने पंतप्रधानांच्या ऍपला जोडण्यात आलाय, जेणेकरून विद्यार्थी त्यांचे अनुभव थेट शेअर करू शकतील. पालक, शिक्षक व विद्यार्थी अशा तिघांनाही उद्देशून लिहिलेले हे पुस्तक शालेय विद्यार्थ्यांनी वाचायला हवे. पेंग्विन रँडम हाऊसने प्रकाशित केलेल्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद पुण्याच्या अमेय इन्स्पायरिंग बुक्सने केला आहे.

Tuesday, December 29, 2009

महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या मराठीच्या परीक्षा

महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या मराठीच्या परीक्षा यावर्षी ५, ६, व ७ फेब्रुवारी २०१० रोजी घेण्यात येणार आहेत. मराठीचे व्याकरण, मराठी शब्द संपत्ती, मराठीचे अचुक व प्रभावी लेखण यासाठी या परीक्षा अत्यंत लाभदायक असुन सर्वच क्षेत्रातील सर्व भाषिक व्यक्तींना त्या विशेष उपयुक्त ठरल्या आहेत. ही परीक्षा देण्यासाठी वयाची अट नाही.
अत्यल्प प्रवेश फी, सुलभ परीक्षा पद्धती ही या परीक्षेची वैशिष्टये असुन उत्तीर्ण विद्यार्थांस प्रमाणपत्र देण्यात येते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पदाधिकरी विनंतीवरुन मार्गदर्शन करतात. गेली पन्नास वर्षे महाराष्ट्र साहित्य परिषद हा उपक्रम राबवत आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क:
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे. फोन: (०२०) २४४७५९६३ / ३२५४५६५९
डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी मो: ९८५०५२८२९६

कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक संचालित: ’साहित्यभूषण परीक्षा’

१९९६ पासुन दरवर्षी मे महिन्यात ही परीक्षा घेण्यात येते.
- ह्या परीक्षेची पूर्ण संकल्पना मा. कुसुमाग्रज यांची आहे.
- ह्या परीक्षेस मराठी साहित्याची आवड असणाऱ्या कुणाही साहित्यप्रेमी रसिकास बसता येते.
- परीक्षेला बसण्यासाठी जरी पूर्व परीक्षेची अट नसली तरी परीक्षेस नेमलेल्या साहित्याचे आकलन करुन उत्तरपत्रिकेत त्यासंबंधी अभिव्यक्ती करण्याची क्षमता अपेक्षित आहे.
- मराठी माणसाला त्याच्या मातृभाषेतील साहित्याकडे वळविण्याचा, वाडमयाचा अभ्यास डोळसपणे व्हावा, म्हणुन हा एक प्रयत्न आहे.
- एम. ए. मराठी ह्या दर्जाची ही परीक्षा असुन कोणत्याही विद्यापीठीय परीक्षेची ती समकक्ष नाही.
- पारंपारीक संकेताप्रमाणे ही परीक्षा नाही. कारण परीक्षेच्या उत्तरपत्रिका २० ते २५ दिवसात घरुनच लिहुन पाठवायच्या आहेत. -- मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अभ्यासपत्रिका व उत्तरपत्रिका (कोऱ्या) यांचा एक संच प्रतिष्ठानकडुन अभ्यासकाकडे रजिस्टर्ड पार्सलने पोहोचविण्यात येतो.
- मे महिन्याच्या अभ्यासकांकडुन उत्तरपत्रिका लिहून इकडे प्राप्त झाल्यावर त्या तज्ज्ञ परिक्षकांकडे पाठविल्या जातात. जुलैच्या पहिल्या वा दुसऱ्या आठवड्यात निकालपत्र अभ्यासकाला पाठवण्यात येते व निकालही जाहीर प्रसिद्ध करण्यात येतो.
- नोंदणी फी रूपये ५० असून ती रोख वा डी. डी. ने स्वीकारली जाते. नंतर अभ्यासक्रम पुस्तिका व फॉर्म पाठविला जातो. परिक्षेला बसण्याची इच्छा असल्यास ३० डिसेंबरपूर्वी परीक्षा शुल्क रू. ४००/- भरावे लागते.
- ह्या परीक्षेस पहिल्या क्रमांकास ’इंद्रायणी’, दुसऱ्या क्रमांकास ’गोदामाता’ व तिसऱ्या क्रमांकास ’कृष्णामाई’ हे पुरस्कार दिले जातात.
- विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या १३ वर्षांत ह्या पहिले वा दुसरे क्रमांक इंजिनियर, शास्त्र पदवीधर, डॉक्टर यांचेच आलेले आहेत.
------ अधिक माहितीसाठी संपर्क: किशोर पाठक, कार्यवाह, साहित्यभूषण परीक्षा समिती, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, कुसुमाग्रज स्मारक, गंगापूर रोड, नाशिक. मोबाईल क्रमांक: ९४२२२५६९०२.