विकिपीडियाच्या ह्या लिंक वरून काढलेली खालील आकडेवारी पहा. 'एथोनॉलॉग' या जगप्रसिद्ध भाषांची माहिती ठेवणाऱ्या कॅटलॉगने सदर तालिका सन 2019 मध्ये प्रसिद्ध केली आहे. सर्वात अभिमानाची गोष्ट म्हणजे आपली मातृभाषा 'मराठी' या तालिकेत जगात दहाव्या क्रमांकावर आहे. ही आकडेवारी प्रथम भाषा बोलणार्या लोकांची आहे. यात एकाच भाषेचे विविध प्रकार वगळण्यात आलेले आहेत. भारतीय भाषांचा विचार केल्यास देशात मराठी ही हिंदी व बंगाली नंतर तिसऱ्या तर जगात चौथ्या क्रमांकाची भाषा आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पहिल्या दहामध्ये मराठी ही अशी एकमेव भाषा आहे, जी फक्त एकाच देशात बोलली जाते! अशी मराठी भाषा बोलत असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो!
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com