Wednesday, March 2, 2022

अभिशाप

#पुस्तक_परीक्षण
📖 अभिशाप
✍️ श्रीकांत कार्लेकर
📚 डायमंड पब्लिकेशन्स

सह्याद्रीमध्ये संशोधन करणारे एक प्राध्यापक आहेत. त्यांच्यासारखाच मनापासून संशोधन करणारा त्यांचा एक विद्यार्थी देखील या कथेमध्ये आहे. या गुरुशिष्यांची जोडी एका नव्या प्रकल्पावर काम करायला सुरुवात करते. तसं हे कार्य पीएचडी प्राप्त करण्यासाठी केलेलं आहे. परंतु संशोधक शिष्य ते मनापासून करतो आणि त्यातून वैज्ञानिक निष्कर्ष काढले जातात. राजकीय लोक मात्र स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी या संशोधनाला कोणतेच महत्त्व देत नाही. त्यातून अघटीत प्रकार घडतो. अशी कथा रचना असलेली ही कादंबरी होय... अभिशाप.
श्रीकांत कार्लेकर यांनी लिहिलेल्या कादंबरीमध्ये एका प्रभावी संशोधनाच्या उपेक्षेची मनाला चटका लावणारी कथा चित्रित केलेली आहे. केवळ ११४ पानांच्या या पुस्तकात आलेले ते कथानक तसे वेगवान म्हणावे लागेल. जवळपास अर्ध्याहून अधिक कादंबरी संवाद रूपानेच पुढे गेलेली दिसते. संशोधनासाठी मनापासून प्रयत्न करणारा विद्यार्थी विरुद्ध केवळ पैशाच्या जोरावर पीएचडी प्राप्त करणारा विद्यार्थी अशा लढाईचा स्पर्श देखील या कादंबरीला झालेला आहे. बहुतांश ठिकाणी देवनागरीमध्ये इंग्रजी भाषेतील वाक्य वापरली गेल्याने त्याचा लवकर अर्थ समजत नाही. एक तर ती इंग्रजीचाच रोमन लिपीमध्ये लिहायला हवी होती किंवा थेट मराठीतच हवी होती. असेही बऱ्याचदा वाटून जाते. ही गोष्ट सोडली तर एक छोटेखानी कादंबरी वाचण्याची हौस हे पुस्तक पूर्ण करते.



🌐 कोठून घेतले : https://bookvishwa.com

© तुषार भ. कुटे 



No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com