Thursday, September 1, 2022

भयंकर सुंदर मराठी भाषा

समाज जीवन सुधारले, पिढ्या बदलल्या की भाषा देखील बदलत जाते. भाषेमध्ये नवीन शब्द तयार होतात. तसेच जुन्या शब्दांचे नवे अर्थ देखील तयार होतात. यातूनच 'भयंकर' सुंदर असे विशेषण मराठी भाषेला लेखकाने दिले आहे. त्यातूनच तयार झालेले पुस्तक 'भयंकर सुंदर मराठी भाषा' होय. सुमारे वीस वर्षांपूर्वी वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली ही एक भाषाविषयक उत्कृष्ट लेखमाला होय. मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या तसेच मराठी भाषेच्या सौंदर्याची चिकित्सा करणाऱ्या प्रत्येक वाचकाला आवडेल असेच हे पुस्तक आहे. भाषा वाचताना तसेच दैनंदिन जीवनामध्ये वापरताना आपण अतिशय सहज व सुलभपणे तिचा वापर करत असतो. परंतु त्यातील सौंदर्य आपल्याला ध्यानात येत नाही. लेखकाने अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी या लेखमालेतून सुंदररित्या वाचकांसमोर मांडलेल्या आहेत. त्यांचे विवेचन देखील अतिशय सुंदर आहे. त्यामुळे त्यांच्या भाषा बुद्धीकौशल्याचे कौतुक करावेसे वाटते.
'मराठी असे आमची मायबोली' हे अभिमानाने सांगावे का? या प्रश्नाचे उत्तर हे पुस्तक आपल्याला निश्चितच देईल.


 

1 comment:

  1. कसे मिळवता येईल? प्रकाशक, बुकगंगा? किंमत... अकराशे पुस्तकं विकत घेऊन संग्रही असणारा वाचक, याचक आहे मी. धन्यवाद.

    ReplyDelete

to: tushar.kute@gmail.com