तंत्रज्ञान शाप की वरदान? अशा शीर्षकाचा निबंध बऱ्याच वेळा शाळेत असताना लिहिलेला आहे. त्यावेळी विचार करायचो की तंत्रज्ञानाचे नेमकी तोटे कोणते? खरंतर तंत्रज्ञान आपल्याला प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी सहाय्य करत असतं. मानवी आयुष्य सुसह्य आणि सुकर करत असतं. याच कारणास्तव त्याच्या तोट्यांकडे आपण सहज डोळेझाक करतो. आणि याच दुर्लक्षाचे दुष्परिणाम नक्की काय होतील, हे आपल्या ध्यानात येत नाही.
मागच्या अनेक वर्षांमध्ये
तंत्रज्ञानाचे असे अनेक तोटे आपल्याला अनुभवायला मिळाले. त्यातीलच ही एक
बातमी. केवळ तंत्रज्ञानावरच विसंबून राहिल्यामुळे दोन जणांना आपला जीव
गमवावा लागला. बायोमेट्रिक पद्धतीने दरवाजांचे स्वयंचलन करणे, ही आजकाल
बहुतांश ठिकाणची मुख्य प्रणाली आहे. परंतु समजा विद्युतप्रवाह खंडित झाला
तर काय? या प्रश्नाचे उत्तर निर्माणकर्त्यांनी शोधले नसावे. आणि याच
कारणास्तव आपल्याला दोन जीव गमवावे लागले. प्रत्येक गोष्टीचे जितके फायदे
आहेत तितकेच किंबहुना त्यापेक्षा अधिक तोटे देखील असतात. त्यावर आपण योग्य
तो उपाय काढू शकतो. परंतु मानवी दुर्लक्षामुळे या उपायांकडे फारसे
गांभीर्याने पहिले जात नाही. याची परिणीती मानवी हानीमध्ये होऊ शकते, हे
दाखवणारी ही एक घटना. अजूनही कोणतेही तंत्रज्ञान बनवताना त्याच्या
तोट्यांकडे अधिक बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे, असे वाटते.
- तुषार भ. कुटे.
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com