Monday, January 11, 2010

मला नको असलेली हॅलो ट्यून...

मागील महिन्यात पुण्याला असताना मला ’एयरटेल’ कंपनीकडून एक प्रोमोशनल फोन कॉल आला.
’हॅलो, सर मी एयरटेल कंपनीकडून बोलतेय.. कंपनीच्या ड्रॉ मधून तुमची फ्री हॅलो ट्यून साठी निवड झाली आहे. तुम्हाला कोणती हॅलो ट्यून मोफत हवी असल्यास सांगा.’
खरं तर मला कोणतीही हॅलो ट्यून नको होती; म्हणून मी तीला सरळ नकार कळवला. त्यावर ती म्हणाली, ’सर ही हॅलो ट्यून आपल्याला पूर्णत: मोफत आहे, त्यासाठी कोणतीही चार्जेस पडणार नाहीत....’
’हो मॅडम, मला समजलं, तुम्हीच आत्ताच सांगीतलं ते... पण तरीही मला नकोय...’
त्यावर ती म्हणाली, ’सर, इथे लोक महिन्याला ४५ रूपये भरून हॅलो ट्यून मागवून घेतात आणि तुम्हाला तर आम्ही फ्री देतोय. तरी तुम्ही घेत नाही.’
मी म्हटले, ’मॅडम तुमची आत्ताची जी हॅलो ट्यून आहे, तीच चांगली आहे. मला दुसरी कोणतीच अन-प्रोफेशनल हॅलो ट्यून नको...’
यावर ती हसायला लागली. व थॅंक यू म्हणून तीने फोन कट केला. कदाचित यानंतर एयरटेल कंपनीने माझा फोन ब्लॅक लिस्ट मध्ये टाकला असावा. कारण, नंतर मला कधीच एयरटेलचा प्रोमोशनल कॉल आला नाही....

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com