Sunday, January 22, 2023

पिकासो

केवळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट म्हणजे 'पिकासो' होय. ही कथा आहे कुडाळ मधील दोन पिता-पुत्रांची. सातवी मध्ये शिकणारा गंधर्व हा एक उत्तम चित्रकार आहे. राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा जिंकल्यामुळे त्याला राष्ट्रीय स्तरावरील पिकासो आर्ट स्कॉलरशिप स्पर्धेमध्ये भाग घेण्याची व जिंकण्याची संधी देखील मिळते. या स्कॉलरशिप अंतर्गत स्पेनमध्ये एक वर्ष राहून चित्रकला शिकता येणार असते. परंतु त्याकरिता काही पैसे भरावे लागणार असतात. पण त्याच्या घरची परिस्थिती अतिशय वाईट असते. त्याचे वडील दशावतारा नाटकांमध्ये काम करणारे साधे कलाकार असतात. रोजचं जीवनच रोजच्या कमाईवर चाललेलं असतं. त्यामुळे अधिकचे पैसे कोठून आणणार, हा प्रश्न उभा राहतो. शेजारच्याच गावामध्ये एका जत्रेत त्याच्या वडिलांचे नाटक चाललेले असते. तो थेट त्या गावामध्ये धाव घेतो. पुढे गंधर्वला स्कॉलरशिप मिळते का? हे पाहण्यासाठी चित्रपट पहावा लागेल. केवळ ७० मिनिटांचा हा चित्रपट आहे. गंधर्वच्या वडिलांच्या भूमिकेतून प्रसाद ओक सोडला तर बाकीचे कलाकार फारसे नावाजलेले नाहीत. सध्या हा चित्रपट अमेझॉन प्राईमवर उपलब्ध आहे.No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com