Thursday, January 12, 2023

वेड लावलय

चिंचवडच्या आयनॉक्स चित्रपटगृहामध्ये रितेश आणि जिनीलियाचा 'वेड' चित्रपटाच्या तिकिटामध्ये डबल धमाका अनुभवयास मिळाला. चित्रपट पाहण्याचा आनंद तर लुटलाच पण तो संपल्यानंतर रितेश आणि जिनीलिया यांचा धमाकेदार प्रवेश आमच्या स्क्रीनमध्ये झाला. त्यांनी 'वेड लावलय' या गाण्यावर जोडीने नृत्य देखील सादर केले! दोघेही त्यांच्या या मराठी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत. त्यांना मराठी प्रेक्षकांची तितकीच दाद आणि साथ देखील लाभत आहे. लवकरच हा चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये जावो, हीच सदिच्छा! No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com