Wednesday, November 19, 2025

जुन्नर आणि बिबटे

कोकणामध्ये जाताना गर्द झाडीमध्ये असणाऱ्या घाटातील एका उपहारगृहापाशी थांबलो होतो. सूर्य मावळला होता आणि हळूहळू अंधार देखील दाटू लागला होता. तेव्हा त्या उपहारगृहाच्या मालकाला विचारले, "इथे बिबटे असतात का हो?"

"आहेत की जंगलामध्ये."

"मग तुम्हाला भीती नाही वाटत?"

"नाही.... सहसा ते मानवी वस्तीमध्ये कधीच येत नाहीत."

"आमच्या इथे तर भर दिवसात देखील लोकांना बिबटे दिसतात आणि हल्ला पण करतात... ", मी म्हणालो. 

यावर त्याने लगोलग प्रश्न केला,

" तुम्ही जुन्नरचे का?"

तेव्हा जुन्नर आणि इथले बिबटे किती प्रसिद्ध झाले आहेत याची प्रचिती आली!