Wednesday, July 7, 2010

महाराष्ट्र देतो किती...?

संदर्भ: दैनिक सकाळ (दि. ७ जुलै २०१०)


महाराष्ट्राच्या दृष्टिने अस्मितेचा भाग बनलेला कर्नाटक सीमाप्रश्‍न गेली पाच दशके धगधगतो आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारी (सात जुलै) केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्र सादर केले. या प्रतिज्ञापत्रात केंद्राने "बेळगावर आणि परिसर हा कर्नाटकचाच भाग आहे,' असे ठामपणाने म्हटले. अर्थातच, सीमावादावर न्यायालयाचा निर्णय अंतिम असणार आहे. प्रश्‍न उरतो तो असा, की देशाच्या प्रगतीत मोठी भूमिका बजावणाऱ्या महाराष्ट्राकडे केंद्र दुजाभावाने पाहते का...?

महाराष्ट्राचे खरेच किती योगदान आहे भारताच्या प्रगतीत यावर ही अत्यंत संक्षिप्त नजर...

भारताच्या आर्थिक प्रगतीत महाराष्ट्राचा वाटा:

भारतातील उद्योग क्षेत्रात महाराष्ट्राचा १९.१ टक्के वाटा
महाराष्ट्रातून १५,२१० मेगावॅट वीज निर्माण केली जाते.
महाराष्ट्राची लोकसंख्या ९६.८८ कोटी (देशाच्या ९.४ टक्के)
महाराष्ट्राचे क्षेत्र ३,०८,००० स्के. किमी. (देशाच्या १० टक्के)
देशाच्या एकूण निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक.
भारतात जमा होत असलेल्या एकुण करापैकी (टॅक्‍स) महाराष्ट्रातून ४० टक्के कर जमा होतो
महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न ७२२ अमेरिकन डॉलर आहे. तर देशाचे ५२१ डॉलर
उद्योगधंद्यांमध्ये महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न ४२७ डॉलर, तर भारताचे १९८ डॉलर
भारतात सर्वाधिक आनंदीत राज्य महाराष्ट्र असून, आनंदीत नागरिक असलेल्या शहरांमध्ये पुणे, मुंबई आणि नागपूर यांचा नंबर लागतो
महाराष्ट्राची भारतातील इतर राज्यांच्या तुलनेत शैक्षणिक, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात आघाडीवर
आर्थिक उलाढालीबाबत महाराष्ट्र भारतात पहिल्या स्थानावर आहे. तर रोजगाराच्या बाबतीतही दुसऱ्या स्थानावर आहे.
महाराष्ट्रात ७७ टक्के लोकसंख्येत साक्षरता
२ आंतरराष्ट्रीय दर्जाची समुद्रातील बंदरे आणि ३८ राज्यस्तरीय बंदरे
३ आंतरराष्ट्रीय दर्जाची विमानतळे, ४ देशांतर्गत उड्डाणे होणारी विमानतळे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा हवाई वाहतूकीने जोडण्यात आला आहे.
महाराष्ट्राचा देशाच्या एकूण रस्ते वाहतुकीत ११ टक्के आणि रेल्वे वाहतुकीत ९ टक्के वाटा
गेल्या तीन दशकांत महाराष्ट्रातील ८,२०० कंपन्यांची संख्या २६,६०० एवढी झाली आहे.
परदेशी कंपन्यांची भारतात सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात १३.६ बिलियन डॉलर
टाटा, बिर्ला ग्रुप आणि रिलायन्स या देशातील तीन महत्त्वाच्या कंपन्यांची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक
भारताची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईकडे पाहिले जाते.

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com