Friday, February 12, 2010

गुरुजींनी सोडवले विद्यार्थ्यांचे पेपर !

नागपूर - महापालिकेच्या शाळेतील शिक्षणाचा दर्जा काय? याची तटस्थ तपासणी करण्यासाठी महापालिकेने एक स्वतंत्र परीक्षा घेतली. त्यात धक्कादायक निकाल लागले. त्यापेक्षाही भयंकर म्हणजे, शेकडो विद्यार्थ्यांचे पेपर्स चक्क गुरुजींनी सोडविले. अशा चाळीस गुरुजींना नोटीस बजावण्यात आल्या असून परीक्षा पद्धतीचे खासगीकरण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

आपल्या शाळेचा निकाल चांगला दाखवण्यासाठी महापालिकेच्या शिक्षकांनी स्वतःच विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका सोडवून दिल्याची धक्कदायक बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. संबंधित सर्व शिक्षकांचा शोध घेण्यात आला आहे. त्यांना नोकरीवरून काढून का टाकण्यात येऊ नये, अशी नोटीस बजावण्यात आली आहे. हा प्रकार टाळण्यासाठी महापालिकेने आता परीक्षा पद्धतीमध्येच बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार पेपर सेटिंग, मूल्यांकरण आणि तपासणीची कामे खासगी संस्थेमार्फत केली जाणार आहे. महापालिकेच्या प्रस्तावित अर्थसंकल्पात याचा समावेश करण्यात आला आहे. महापालिकेच्या इयत्ता पहिली ते दहावीच्या शैक्षणिक सत्रात दोन घटक चाचण्या, एक सत्र परीक्षा व द्वितीय सत्रात दोन घटक चाचण्या आणि एक वार्षिक परीक्षा घेण्यात येते. यापुढे खासगी संस्था किवा अनुभवी पब्लिकेशन संस्थांना कामे दिली जाणार आहे. याकरिता निविदा बोलावण्यात येणार आहे. निवड करण्यात आलेल्या संस्थेला परीक्षेच्या दिवशी व परीक्षा वेळेच्या एक तासापूर्वी प्रश्‍नपत्रिका पोचवणे आवश्‍यक राहील. तसेच परीक्षेचे संचालन करणे, तपासणी, परीक्षा संपल्यावर पेपर गोळा करणे, मूल्यांकन फेर मूल्यांकन आणि निकालपत्र लावण्याची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी उपरोक्त माहिती दिली. याशिवाय महापालिकेच्या अर्थसंकल्पात यावर होणाऱ्या खर्चाची तरतूदसुद्धा करण्यात येणार आहे.


दैनिक सकाळ मध्ये दोन दिवसांपूर्वीच प्रकाशित झालेली ही बातमी...! या बातमीमध्ये शिक्षकांची संख्या निश्चित दिली नसली. तरी दैनिक गावकरी मध्ये यात समाविष्ट शिक्षकांची संख्या ही ४० दिलेली आहे! आपल्या शिक्षणपध्दतीला किती लाजिरवाणी गोष्ट आहे ही. केवळ एकाच शाळेची ही बाब ध्यानात आली. आणखी किती शाळा अश्या प्रकारचे उद्योग करत असतील कोण जाणे. या प्रकारांमुळे शिक्षकांची बदनामी होत आहे. शिवाय विद्यार्थ्यांचे तर मोठेच नुकसान आहे. भारतीय शिक्षणपध्दती सुधारायची असल्यास अशा प्रकारांना आळा घालणे अत्यंत गरजेचे आहे...

5 comments:

  1. we make private organisation who take all responsiblities about examination but it also do their work in proper way otherwise there is no meaning of this.

    ReplyDelete
  2. It is very shocking. Shame on the people who do it. Where the indian education system is going...?

    ReplyDelete
  3. Most of the teachers does the same in technical education also...

    ReplyDelete
  4. अशा पध्दतीने भारतीय शिक्षणपद्धती जाणार असेल तर काय उपयोग?

    ReplyDelete

to: tushar.kute@gmail.com