Sunday, May 16, 2021

द अल्केमिस्ट

प्रेरणादायी पुस्तकांच्या यादी मधलं हे एक नाव... "द अल्केमिस्ट". ही कथा आहे एका मेंढपाळाची, जो खजिन्याच्या शोधार्थ फिरतो आहे. एका खंडातून दुसऱ्या खंडात गेलेला आहे. तिथून वाळवंटाद्वारे तो पिरॅमिडच्या प्रदेशात अर्थात इजिप्तपर्यंत पोहोचतो. या त्याच्या प्रवासामध्ये अनेक अडथळे येतात. त्याला काही संकटांचा सामना करावा लागतो. पण त्यातूनच त्याला अनुभव मिळत जातो. बाहेरचं जग कसा आहे, हे समजत जातं. नव्या गोष्टी तो शिकत चालतो. त्याच्या या प्रवासाने शिकवलेले अनुभव त्याला बरेच काही देऊन जातात. आपल्यामध्ये क्षमता किती आहेत? याची अनेकांना जाणीव नसते. अर्थात खजिना नक्की कुठे आहे? हेच आपण आयुष्यभर शोधत राहतो. परंतु या खजिन्याची दिशा व मार्ग आपल्याला प्रयत्नाने कधी ना कधीतरी सापडतोच, अशी कथा आहे... अल्केमिस्ट या पोर्तुगीज कादंबरीची. एका मेंढपाळाच्या प्रवासाभोवती फिरणारी ही कथा बरंच काही शिकवून जाते. एकाग्रतेने व सलगतेने वाचल्यास तिचा प्रभाव मात्र अनेक काळ आपल्या मनावर टिकून राहतो.No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com