Tuesday, December 29, 2009

कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक संचालित: ’साहित्यभूषण परीक्षा’

१९९६ पासुन दरवर्षी मे महिन्यात ही परीक्षा घेण्यात येते.
- ह्या परीक्षेची पूर्ण संकल्पना मा. कुसुमाग्रज यांची आहे.
- ह्या परीक्षेस मराठी साहित्याची आवड असणाऱ्या कुणाही साहित्यप्रेमी रसिकास बसता येते.
- परीक्षेला बसण्यासाठी जरी पूर्व परीक्षेची अट नसली तरी परीक्षेस नेमलेल्या साहित्याचे आकलन करुन उत्तरपत्रिकेत त्यासंबंधी अभिव्यक्ती करण्याची क्षमता अपेक्षित आहे.
- मराठी माणसाला त्याच्या मातृभाषेतील साहित्याकडे वळविण्याचा, वाडमयाचा अभ्यास डोळसपणे व्हावा, म्हणुन हा एक प्रयत्न आहे.
- एम. ए. मराठी ह्या दर्जाची ही परीक्षा असुन कोणत्याही विद्यापीठीय परीक्षेची ती समकक्ष नाही.
- पारंपारीक संकेताप्रमाणे ही परीक्षा नाही. कारण परीक्षेच्या उत्तरपत्रिका २० ते २५ दिवसात घरुनच लिहुन पाठवायच्या आहेत. -- मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अभ्यासपत्रिका व उत्तरपत्रिका (कोऱ्या) यांचा एक संच प्रतिष्ठानकडुन अभ्यासकाकडे रजिस्टर्ड पार्सलने पोहोचविण्यात येतो.
- मे महिन्याच्या अभ्यासकांकडुन उत्तरपत्रिका लिहून इकडे प्राप्त झाल्यावर त्या तज्ज्ञ परिक्षकांकडे पाठविल्या जातात. जुलैच्या पहिल्या वा दुसऱ्या आठवड्यात निकालपत्र अभ्यासकाला पाठवण्यात येते व निकालही जाहीर प्रसिद्ध करण्यात येतो.
- नोंदणी फी रूपये ५० असून ती रोख वा डी. डी. ने स्वीकारली जाते. नंतर अभ्यासक्रम पुस्तिका व फॉर्म पाठविला जातो. परिक्षेला बसण्याची इच्छा असल्यास ३० डिसेंबरपूर्वी परीक्षा शुल्क रू. ४००/- भरावे लागते.
- ह्या परीक्षेस पहिल्या क्रमांकास ’इंद्रायणी’, दुसऱ्या क्रमांकास ’गोदामाता’ व तिसऱ्या क्रमांकास ’कृष्णामाई’ हे पुरस्कार दिले जातात.
- विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या १३ वर्षांत ह्या पहिले वा दुसरे क्रमांक इंजिनियर, शास्त्र पदवीधर, डॉक्टर यांचेच आलेले आहेत.
------ अधिक माहितीसाठी संपर्क: किशोर पाठक, कार्यवाह, साहित्यभूषण परीक्षा समिती, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, कुसुमाग्रज स्मारक, गंगापूर रोड, नाशिक. मोबाईल क्रमांक: ९४२२२५६९०२.

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com