Tuesday, August 10, 2010

विरोधकांचा सभात्याग

गेल्या काही वर्षांपासून लोकप्रतिनिधीगृहांमध्ये लोकप्रतिनिधींचा सभात्याग हा मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. एखादी गोष्ट आपल्या मनासारखी नाही घडली किंवा सत्ताधारी पक्षाने समाधानकारक उत्तर दिले नाही, तर आजकाल विरोधी पक्षाचे एकच उत्तर असते... सभात्याग! संसदेत एखाद्या प्रश्नी सत्ताधाऱ्यांना कोंडित उपाय कसा शोधायचा? यापेक्षा गेल्या दोन-तीन वर्षांतसभात्यागका एक उत्तम मार्ग विरोधकांनी अवलंबल्याचे दिसते. खरं तर अशा प्रकारेनिषेधनोंदवल्याने सत्ताधाऱ्यांचा एक प्रकारे नैतिक विजयच होत असतो.
आजकाल जबाबदार विरोधी पक्षही सभात्यागाचे हत्यार वापरीत आहेत, याचे विशेष आश्चर्य वाटते. यातून एक बाब मात्र ध्यानात येते की, विरोधी पक्ष हे निष्क्रिय होत चालले आहेत. कदाचित सत्ता नसल्याने आलेला तो एक निराशावाद असावा. संसदेमध्ये चर्चा ही विविध समस्यांवर उपाय शोधण्यासाठी असतात. लोकप्रतिनिधींनी स्वत:ची बाजु भक्कमपणे मांडायची असते. याच कारणांमुळे लोकप्रतिनिधी हा एक उत्तम अभ्यासक वक्ताही असावा, असे माझे प्रामाणिक मत आहे. सत्ताधाऱ्यांनी दिलेल्या उत्तरावर प्रत्युत्तर देण्याची त्याची क्षमता असायला हवी. अश्या प्रकारचे लोकप्रतिनिधी पूर्वी संसदेत मोठ्या प्रमाणात पाहायला मिळायचे. सरकारला अगदी छोट्या-छोट्या पक्षांच्या लोकप्रतिनिधींनीही कोंडित पकडल्याचे प्रश्न सोडवल्याचे संसदेने काही वर्षांपूर्वी पाहिले आहे. आजकाल विरोधी पक्षांकडेच ठोस उपाय दिसून येत नाही. त्यामुळे काही बोलण्यापेक्षा सतत विरोधच करण्यापेक्षा त्यांना सभात्याग करणे सोपे वाटते. पारदर्शक लोकशाहीच्या दृष्टीने ही एक लाजिरवाणी बाब आहे.
वाढत्या महागाईच्या मुद्यावर विरोधकांनी सभात्याग केला. महागाईचा विरोधी पक्षांनी निषेध करायला हवा, हे योग्य आहे. पण, नुसतेच सरकारने दरवाढ मागे घ्यावी असे बोंबलत बसण्यापेक्षा त्याची कारणे स्वत: सुचविलेले उपाय यावर चर्चा घडवून आणता आली असती. यातून एक गोष्ट मात्र ध्यानात आली. विरोधी पक्षांकडेही महागाईवर ठोस उपाय नव्हता. फक्त सरकारला कोंडित पकडण्यासाठी त्यांचाहातकसाआम आदमीच्या गळ्यावर आहे, एवढेच आपल्या स्टंटबाजीने विरोधी पक्षांना दाखवायचे होते. आजही प्रभावी वक्ते अभ्यासक विरोधी पक्षांच्या पॅव्हेलियन मध्ये आहेत. पण, प्रत्यक्ष मैदानावर उतरायला ते का घाबरतात? याचे उत्तर मात्र सापडत नाही.
या घटनांची दुसरी बाजू लक्षात घेतली तर संसदेच्या एका दिवसाच्या कामकाजासाठी करोडो रुपये खर्च केले जातात. एखाद्या दिवशी कामकाज झाले नाही किंवा गोंधळाने तहकूब झाले तर हा सर्व खर्च वाया जातो. अर्थात, बिनकामाचे आपल्या खासदारांना पैसे मिळत असतात. कदाचित, काम करताच पैसे मिळविण्यासाठी खासदार असे नाना विविध मार्ग अवलंबत असावेत, अशी शंका येते. कालच पुन्हा राष्ट्रकुल स्पर्धांवरून विरोधी पक्षनेत्यांनी सभात्याग केला. सरकारला जाब विचारण्याऐवजी पुन्हा एकदा त्यांनी सभात्याग केला. खरं तर अशा घटनांनी सरकारही कशाची काळजी करण्याइतके निबर बनून जाईल. विरोधी पक्षांचा त्यांना धाक राहणार नाही. जोपर्यंत सत्ताधारी विरोधी पक्षांच्या शाब्दिक चकमकी संसदेत उडणार नाहित, तोपर्यंत प्रश्न सुटणार नाहित, हे लोकशाहीच्या सूत्रांपैकी एक सूत्र आहे.
कधीकधी असं वाटतं की, आज या खासदाराला घरून तंबी मिळली आहे...’आज लवकर घरी या बरं का... नाहीतर घरात घेणार नाही.’ मग आपल्यागृहमंत्र्याच्या आदेशावर खासदार साहेब काहितरी कारण काढून सभात्याग करत घरी पलायन करत असावेत. कोण जाणे, बहुधा अशीच परिस्थिती असेल!
सामान्य माणूस या परिस्थितीचा नीट अंदाज घेत नाही. आज या खासदाराने आपल्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावरून संसदेतून सभात्याग केला. यातच सामान्यांचे समाधान असते. त्या खासदाराकडे सरकारला प्रश्न विचारण्याची हिंमत नाही, हे आपल्या ध्यानात येत नाही. त्यामुळे आता सर्वसामान्यांनीच आपल्या लोकप्रतिनिधींना आज संसदेतून सभात्याग का केला? याचे उत्तर विचारायला हवे...

2 comments:

to: tushar.kute@gmail.com