Wednesday, May 5, 2010

लहरती वाऱ्याचे नि:श्वास...

सावरिया.कॉम या मराठी चित्रपटातील एक सुमधूर गीत मला शब्दबद्ध करावेसे वाटले. ते इथे लिहित आहे....

लहरती वाऱ्याचे नि:श्वास,
मिळसले त्यात कळीचे श्वास,
हे श्वास कुणाचे, माझे की तुझे,

वाकले धरणीवर आकाश,
झाकले अधरांनी अधरास,
हे ओठ कुणाचे, माझे की तुझे,

सुखावे शिंप तहानेली,
बरसली सर पहिली वहिली,
ही तृषा कुणाची, माझी की तुझी,

गुंतला तरूवर वेलीमध्ये,
वेलही जन्मांची कैदी,
ही कैद कुणाची, माझी की तुझी,

नितळले क्षितीज जणू गगनात,
विरघळे प्राण जणू प्राणात,
हे प्राण कुणाचे,माझे की तुझे,

चिंब भिजले मन काठोकाठ
बरसते प्रेमाची बरसात
हे प्रेम कुणाचे, माझे की तुझे,

लहरती वाऱ्याचे नि:श्वास,
मिळसले त्यात कळीचे श्वास,
हे श्वास कुणाचे, माझे की तुझे,


चित्रपट: सावरिया.कॉम
गायिका: निहिरा जोशी
संगीत: अशोक पत्की
गीत: सुधीर मोघे

हे गाणे इथे डाऊनलोड करता येईल...

1 comment:

to: tushar.kute@gmail.com