Saturday, May 22, 2010

पाकिस्तानी कारनामे

पाकिस्तानने नुकतेच यूट्यूब, फ़ेसबूक व ट्विटर या तीन मोठ्या साईट्सवर आपल्या देशात बंदी घातली. प्रेषित मोहम्मद पैगंबरांदद्दल अवमान कारक मजकूर प्रसिद्ध केल्याबद्दल ही बंदी घालण्यात आली. पायाला जखम होऊन वेदना होत असतील तर तो पायच कापून टाकण्यासारखा हा प्रकार झाला आहे.

यापूर्वीही अनेक पूजनीय व्यक्तींबद्दल काही सोशल नेटवर्किंग साईट्स वरती अवमानकारक मजकूर प्रसिद्ध झाले होते. याविषयी सदर साईटकडे तक्रार केल्यावर ते मजकूर काढून टाकण्यात आले होते. त्यावर थेट बंदीची कारवाई कधी करण्यात आली नाही. सोशल नेटवर्किंग साईट्स वर रोज मोठ्या प्रमाणात माहिती प्रसारित होते. तीच्यावर देखरेख ठेवण्यासाठी यूट्यूब, फ़ेसबूक ने विशेष तंत्रज्ञ नेमले आहेत. त्याची शहानिशा न करताच पाकिस्तानने उचललेले हे पाऊल चूकिचे आहे. उद्या एखाद्या साईटवर बंदी घालण्यासाठी कोणीही तिच्यावर कोणताही निंदणीय मजकूर प्रसिद्ध करेल. या प्रकारचा ट्रेंड अशा घटनेतून तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाकिस्तानी सरकारने रीतसर तक्रार नोंदवून कारवाई केली असती, तर योग्य झाले असते. पण, त्या कट्टरवादी मूर्खांना कोण सांगणार...?

1 comment:

  1. आपल्या देशात इथुन पुढे राजकारणी लोक काय काय करतील ते सांगता येत नाही. शेवटी जनताच मरणार आहे....

    ReplyDelete

to: tushar.kute@gmail.com