मराठी संगीताविषयी थोडं हेही वाचा.
------------------------------ ------------------------------------------------------------------
हिंदीच्या कर्णकर्कश संगीताकडे आजची मराठी तरूणाई आकर्षित होत असताना अनेक बिगर मराठी गायक व संगीतकार मराठी संगीतात विशेष योगदान देत आहेत, याची माहिती बहुतांश लोकांना नसावी.
- श्रेया घोषाल यांचे महाराष्ट्रातील प्रदार्पण ’मस्त शारदीय रात’ या मराठी अल्बम द्वारे झाले होते. नागपूरचे वसंत कृष्ण वऱ्हाडपांडे यांच्या गीतांचा हा अल्बम आहे.
- मराठीत सर्वोत्कृष्ट गायिकेचा राष्ट्रीय पुरस्कार केवळ दोघींना मिळाला आहे- अनुराधा पौडवाल व श्रेया घोषाल.
- मराठीत सर्वोत्कृष्ट गायकाचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार हरिहरन यांनी मिळवला आहे.
- हरिहरन व महालक्ष्मी अय्यर यांनी गायलेले ’आता गं बया’ या चित्रपटातील गीताची ’लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नोंद आहे. असा विक्रम असणारे हे मराठीतील केवळ दुसरे गीत होय. या गीताबरोबरच ’मराठी अभिमान गीता’चीही इथे नोंद आहे. विशेष म्हणजे ह्याही गीतामध्ये हरिहरन व महालक्ष्मी अय्यर यांचा आवाज आहे!
- महालक्ष्मी अय्यर यांनी महाराष्ट्रात आल्यावर आपले उच्चार सुधारावे म्हणून एक वर्ष कठोर मेहनत घेतली. आज हिंदीपेक्षा अधिक पुरस्कार त्यांना मराठी गाण्यांसाठी मिळाले आहेत.
- शंकर महादेवन यांचे पुत्र सिद्धार्थ महादेवन याने आपल्या संगीतकार म्हणून करियरची सुरूवात मराठी चित्रपटाने केली आहे.
- मराठी लोकांना मराठी संगीताची चव कळत नाही म्हणून अजय-अतुलने संगीत दिलेल्या ’जत्रा’ ह्या चित्रपटाचे सांगितीक हक्क व्हिडिओ पॅलेसने केवळ एक लाखाला विकत घेतले. थोड्याच दिवसांत त्यातील केवळ एकाच गाण्याचे हक्क व्हिडिओ पॅलेसकडून घेण्यासाठी करण जोहरला दहा लाख रूपये मोजावे लागले होते. हे बॉलिवूडमध्ये एक सुपरहिट गाणे ठरले.
- इंडियन आयडॉलच्या पहिल्या पर्वाचा विजेता अभिजित सावंत तसेच त्याच्यासोबतचे प्राजक्ता शुक्रे व राहुल वैद्य आज कुठे आहेत? हे आपल्याला माहित नाही! त्याच पर्वात नवव्या क्रमांकावर असणारा राहुल सक्सेना आज मराठीतील एक आघाडीचा गायक आहे. दोन वेळा तो मराठी सारेगमपचा उपविजेता ठरला होता.
- मूळची तमिळ असणारी अभिलाषा चेल्लम हिने सर्वाधिक गाणी मराठी भाषेत गायली आहेत.
- हरिहरन यांचा मुलगा अक्षय हरिहरन याने आपल्या संगीतकार म्हणून करियरची सुरूवात मराठी चित्रपटाने केली आहे. यातील सर्व गीते हरिहरन व शंकर महादेवन यांनी गायली होती.
- जान्हवी अरोरा हीने सर्वाधिक गाणी मराठी भाषेत गायली आहेत.
- मराठी कट्टरवादी म्हणून ओळखला जाणारा ’महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ ह्या राजकिय पक्षाची दोन गौरवगीते आहेत. त्यातील एक गीत शंकर महादेवन यांनी तर दुसरे शंकर महादेवन, कुणाल गांजावाला व शान यांनी गायले आहे.
------------------------------

छान..
ReplyDeleteमस्त रोमॅण्टिक गाणे http://youtu.be/EqBbLK0FsyY