Friday, August 8, 2025

GPT-5 ची घोषणा

OpenAI ने अधिकृतपणे ७ ऑगस्ट रोजी GPT-5 हे नवीन मॉडेल (तंत्रज्ञान) बाजारात आणले आहे. त्यांनी म्हटले आहे की हे आतापर्यंतचे सर्वात हुशार, जलद आणि उपयुक्त मॉडेल आहे.

हे मॉडेल आता Free, Plus, Pro, आणि Team या सर्व प्रकारच्या वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. GPT-5 मुळे आता लेखनासाठी, कोडिंगसाठी, आरोग्य आणि इतर अनेक गोष्टींसाठी जलद, अधिक अचूक आणि संदर्भाला अनुसरून प्रतिसाद मिळणार आहे.

Pro वापरकर्त्यांना GPT-5 Pro चा वापर करता येईल, जी सर्वात प्रगत आवृत्ती आहे. ती मोठ्या आणि क्लिष्ट कामांसाठी विशेष बुद्धिमत्ता प्रदान करते.

हे नवीन GPT-5 मॉडेल आता GPT-4o, GPT-4.5 आणि इतर जुन्या आवृत्तीची जागा घेणार आहे. तुम्हाला ते वेगळे निवडण्याची गरज नाही. फक्त ChatGPT उघडा आणि लिहायला सुरुवात करा.

ज्या वापरकर्त्यांचा मोफत वापर (free-tier) आहे, त्यांना हे मॉडेल हळूहळू उपलब्ध होईल. त्यांची मर्यादा संपल्यावर ते आपोआप GPT-5 Mini वर जातील. Enterprise आणि Edu वापरकर्त्यांना हे मॉडेल एका आठवड्यात उपलब्ध होईल.


हे मॉडेल जुन्या व्हर्जनपेक्षा खूपच प्रगत आहे.

- GPT-5 च्या प्रतिसादांमध्ये GPT-4o च्या तुलनेत 45% कमी चुका आहेत.
- तर्क लावण्याच्या कामांमध्ये OpenAI च्या O3 मॉडेलच्या तुलनेत 80% कमी चुका आहेत.
- OpenAI ने या मॉडेलमध्ये सुरक्षा यंत्रणा आणखी मजबूत केली आहे, जेणेकरून चुकीची माहिती (hallucinations) मिळण्याचे प्रमाण कमी होईल आणि जैविक धोके निर्माण होतील, असे प्रतिसाद तयार होणार नाहीत.

कोडिंगच्या बाबतीत, GPT-5 आता फक्त एकाच सूचना देऊन 'मिनी-बॉल सिम्युलेटर' किंवा 'टायपिंग गेम्स' सारखे गेम्स तयार करू शकते. तसेच लेखन, संपादन (editing), ई-मेल आणि आरोग्याशी संबंधित प्रश्नांवरही ते अधिक चांगले काम करते.

OpenAI ने सांगितले आहे की आरोग्याशी संबंधित प्रश्नांवर जरी GPT-5 चांगले काम करत असले, तरी त्याचा उद्देश डॉक्टरांची जागा घेणे नाही, तर त्यांना मदत करणे हा आहे!

(आधारित)

--- तुषार भ. कुटे

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com