Thursday, August 14, 2025

पुन्हा सही रे सही

जवळपास वीस वर्षांपूर्वी भरत जाधव यांचे “पुन्हा सही रे सही” हे नाटक नाशकातल्या कालिदास कला मंदिर नाट्यगृहामध्ये सर्वप्रथम मी पाहिले. आज पुन्हा हेच नाटक चिंचवडच्या रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये पाहण्याची संधी मिळाली. आणि नाटकाचा प्रयोग क्रमांक होता ४५००! 
अनेक मराठी नाटके हजारांवर प्रयोग करीत आहेत. आणि विशेष म्हणजे मराठी रसिक प्रेक्षकांकडून देखील त्यांना तशी दाद मिळत आहे. यातीलच हे एक नाटक. या नाटकातील भरत जाधव यांच्या भूमिकेला अर्थात चौरंगी भूमिकांना तोड नाही. कदाचित याच कारणास्तव या नाटकाने इतका दीर्घ पल्ला आज गाठलेला दिसतो. मध्यंतरामध्ये भरत जाधव यांच्या हस्ते प्रेक्षागृहामध्ये केक देखील कापण्यात आला. त्यावेळी त्यांनी सांगितले की या नाटकाच्या तालमी त्यांनी पिंपरी चिंचवडमध्येच घेतल्या होत्या. आणि आज योगायोगाने साडेचार हजारावा प्रयोग याच शहरामध्ये पार पडला. २३ वर्षे या नाटकाचा प्रवास चालू आहे. भरत जाधव यांच्यामधील ऊर्जा तसूभरही कमी झालेली दिसत नाही. म्हणूनच मराठी प्रेक्षक आपल्या कलाकारांवर भरभरून प्रेम करतात. या नाटकाची सध्याची प्रगती पाहता लवकरच पुढील काही वर्षांमध्ये ५००० वा प्रयोग देखील आपल्याला पाहायला मिळेल, अशी आशा वाटते.



No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com