वि. वा. शिरवाडकर यांची काही कादंबऱ्या पुस्तकांच्या कपाटाच्या बाहेर काढून ठेवलेल्या होत्या. तेवढ्यात 'तो' एक जण आला. त्याने पुस्तके चाळायला सुरुवात केली. एका पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखकाचे छायाचित्र होते. त्याने टक लावून पाहिले. काहीसे आठवल्यासारखे केले व तेवढ्यात त्याचा दिवा पेटला असावा. त्याने मला विचारले,
"या पुस्तकाचे लेखक बघ... ते मराठी कवी नाही का, कुसुमाग्रज... त्यांच्यासारखे दिसतायेत."
मी वळून त्याच्याकडे बघितले. पुस्तकावरचा तो फोटो पाहून स्मितहास्य केले आणि त्याला हसून दुजोरा दिला,
"नाही रे! हे त्या नटसम्राट नाटकाचे नाटककार आहेत ना, त्यांच्या सारखेच दिसतात...!!!"
मग तो सुद्धा परत ते छायाचित्र टक लावून पाहू लागला.
Showing posts with label shirwadkar. Show all posts
Showing posts with label shirwadkar. Show all posts
Thursday, May 27, 2021
Wednesday, March 18, 2020
काही वृद्ध काही तरुण
मानवी भावविश्वाचा विविध भावनांचा वेध घेणारा कथासंग्रह म्हणजे 'काही वृद्ध
काही तरुण' होय. शिरवाडकरांच्या या कथासंग्रहात एकूण नऊ कथा आहेत.
माणसांच्या मनाचे अंतरंग उलगडण्याचे काम त्यांनी या कथांमधून केले आहे.
लेखकाचं भाषेवरील प्रभुत्व कथा वाचताना वाचकाला खिळवून ठेवते, हे त्या
पुस्तकाचे मुख्य वैशिष्ट्य होय. पहिल्यांदाच त्यांच्या कथासंग्रहाला
शीर्षकाच्या नावाची कथा आढळली नाही, हेही पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणता येईल!
Tuesday, March 10, 2020
प्रेम आणि मांजर
वि. वा. शिरवाडकर यांच्या विनोदी बुद्धीने सजलेला व रंगलेला कथांचा संग्रह
म्हणजे 'प्रेम आणि मांजर' होय. या पुस्तकात सर्वच कथा या विनोदी आहेत. केवळ
सात कथांमधून शिरवाडकरांनी हलक्या-फुलक्या नाटिका सादर केलेल्या आहेत.
मराठी विनोदी परंपरेत शिरवाडकरांचे नाव निश्चित उच्च दर्जाचे असल्याचे सर्व
कथांमधून प्रतीत होतं.
Saturday, February 15, 2020
बारा कथा
कविवर्य कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांचा मी
वाचलेला हा पहिलाच कथासंग्रह. डॉ. बा. वा. दातार यांनी त्याचे संपादन केले
आहे. नावाप्रमाणेच यात 12 कथा आहेत. सर्वच वेगळ्या विषयाला वाहिलेल्या.
पहिल्या दोन-तीन कथा प्रेम व विरह यावर आधारित होत्या. त्यामुळे असं वाटलं
की, नंतरच्या ही कथा अशाच असतील. परंतु शिरवाडकरांनी विविध विषयांवर हात
घातल्याचे दिसते. यातील तीन कथा या रहस्य प्रकारात मोडणाऱ्या आहेत. लेखकाचे
भाषेवर असलेलं प्रभुत्व सर्वच कथांतून प्रतीत होतं. कथा कशी असावी? याचे
प्रात्यक्षिक उदाहरणच शिरवाडकरांनी त्यांच्या लेखणीतून दाखवून दिले आहे.
कोणतीच कथा ही कंटाळवाणी वाटत नाही. अगदी एकाच बैठकीत संपून टाकावे, असे हे
पुस्तक आहे. वाचनाला सलग वेळ मिळत नसल्याने मी कादंबरी ऐवजी कथासंग्रह
वाचतो. अर्थात प्रत्येकाची पद्धत निराळी असतेच. परंतु, हे पुस्तक मी एकाच
बैठकीत संपवले हे विशेष!
कवीचे भाषेवर जबरदस्त प्रभुत्व असते, हे शिरवाडकरांच्या साहित्यकृतीतून जाणवते. त्यामुळे कथा आणि साहित्यप्रेमींसाठी सदर पुस्तक मेजवानी ठरावे असेच आहे.
Subscribe to:
Posts (Atom)