Thursday, March 18, 2010

मायावतींची माया...


परमपूज्य बहन मायावतींच्या हजारांच्या नोटांच्या माळेची रम्य कहाणी गेल्या दोन दिवसांपासून वृत्तपत्रांतून वाचावयास मिळते आहे. खरोखर ती वाचून मन अगदी प्रसन्न झाले. आज ’अस्सल’ भारतीय नेते व भारतीय लोकशाही कुठे पाहायला मिळते... तर ती उत्तर प्रदेश व बिहार मध्येच...! उगाच आपली लोकं बिचाऱ्यांना नावे ठेवत असतात. अस्सल भारतीय लोकशाहीचा ठेवा जपणाऱ्यांचा जाहीर सत्कार होणे गरजेचे आहे. त्यांना केवळ हजार रूपयांच्याच नव्हे तर हजार-हजार डॉलरच्या मालांचा उपहार देणे गरजेचे आहे. एका अत्यंत मागास राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी असे पराक्रम केल्यानंतर जी जनता गप्प बसली, तीचे मी मनापासून अभिनंदन करतो. त्यात त्यांचाही काय दोष म्हणा? सगळे एका माळेचे मणी. पण, एक मात्र सांगतो असे पराक्रम आमच्या राज्यात झाले असते तर.... अरेरेरे... पुढे काय झाले असते याची कल्पना आमुच्या मुख्यमंत्र्यांनीच केलेली बरी...!
आपले स्वत:चे व आपल्या हत्तीचे (वेगेळ्या सोंडेच्या) पुतळे उभारून उ.प्र. च्या मुख्यमंत्र्यांनी जी किमया आजवर करून दाखविली ती कदाचितच कोणी करून दाखविली असेल. याला म्हणतात स्त्री शक्ती...! नुकतेच राज्यसभेत आरक्षण मंजूर झाल्यावर त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध करून दाखविलेच...!
अशीच आपुले सर्व राजकारणी जनतेच्या पैशाची खुलेआम ’वाट लावो’ याकरीता मनापासून शुभेच्छा...! जय हिंद... जय उ.प्र....
टीप: शेजारचा फोटो हा ब्रिटनच्या डेली टेलीग्राफ मधून घेण्यात आलेला आहे. (तिथेही आपुली कीर्ती पोहोचली म्हणा की...)

1 comment:

  1. KUTHE AAPLE THOR PURUSH SWAMI VIVEKANANDA, MAHATMA GANDHI, TAGORE,TILAK, BHAGAT SING, SAVARKAR...AAANI AAJ APLI HI AVASHTA...
    EVERY HAIR OF BODY STANDS AS I SEE THESE INCIDENCES....

    ReplyDelete

to: tushar.kute@gmail.com