Saturday, April 3, 2010

आजि म्या सौरव पाहिला...


कोलकता नाईट रायडर्सची परवाची मॅच पाहिली. खरोखर खूप दिवसांनी सौरव गांगूलीची बहारदार फलंदाजी पाहायला मिळाली. तो दिवसच गांगुलीचा होता. डेक्कन चार्जर्स विरूद्ध त्या दिवशी जर सौरवचे शतक झाले असते तर दुधात साखरच पडली असती. गांगुली ८८ धावांवर झेलबाद झाला.

उत्तुंग षटकार ही सौरव गांगुलीची खरी ओळख क्रिकेटप्रेमींना आहे. घरच्या मैदानावर त्याने तेच उत्तुंग षटकार तडकावून प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. कोलकता नाईट रायडर्सला तीन मॅच नंतर यशाची चव चाखायला मिळाली. गेल्या काही वर्षांपासून सौरवच्या बॅटमधून धावांचा ओघ आटला होता. पण, त्याने त्या मान्सूनची सुरूवात पुन्हा केली आहे. कोलकता नाईट रायडर्सला याचा निश्चितच फायदा होईल.

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com